पेट्रोल-डिझेल दरवाढ, दानवेंच्या वक्तव्याचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:35 IST2020-12-13T04:35:49+5:302020-12-13T04:35:49+5:30
जामखेड : पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलेल्या शेतकरी विरोधी वक्तव्याचा जामखेड तालुका शिवसेनेच्या वतीने ...

पेट्रोल-डिझेल दरवाढ, दानवेंच्या वक्तव्याचा निषेध
जामखेड : पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलेल्या शेतकरी विरोधी वक्तव्याचा जामखेड तालुका शिवसेनेच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला. शहरातील खर्डा चौकात शिवसैनिकांनी दानवे यांच्या प्रतिमेला जोडे मारले. यावेळी केंद्र सरकार व दानवे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी यांच्या नेतृत्वाखाली तालुका शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी तालुका प्रमुख संजय काशिद, उपप्रमुख गणेश उगले, शहर प्रमुख गणेश काळे, युवा सेनेचे सावता हजारे, अल्पसंख्यांक प्रमुखचे नासिर खान, प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष जयसिंग उगले, नय्युम शेख, संदिप भुजबळ, सागर गुंदेचा, बंडू डांगरे, नागराज जंगम, बप्पा उगले, बब्रुवान वाळुंजकर, संतोष वाळुंजकर, आकाश आयकर, संदीप शिंदे, श्रीकांत चव्हाण, पांडुरंग उगले, संतोष शिंदे, युवराज उगले, किशोर मोहिते, किरण म्हेत्रे, प्रकाश जाधव, शशी खटावकर, प्रमोद वाघ आदी उपस्थित होते.
( फोटो १२ जामखेड शिवसेना)
जामखेड येथील खर्डा चौकात शिवसेनेच्या वतीने केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध नाेंदविला.