पेट्रोल-डिझेल मिळतेय टपरीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:19 IST2021-03-06T04:19:41+5:302021-03-06T04:19:41+5:30
पेट्रोल विक्रीचा कोणताही परवाना नसताना विकल्या जाणाऱ्या पेट्रोलमुळे अपघात होण्याचा धोका आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज आहे. ...

पेट्रोल-डिझेल मिळतेय टपरीवर
पेट्रोल विक्रीचा कोणताही परवाना नसताना विकल्या जाणाऱ्या पेट्रोलमुळे अपघात होण्याचा धोका आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.
ग्रामीण भागात पेट्रोलपंप बहुधा मुख्य रस्त्यावर व गावापासून लांब असल्याने गावातील किराणा दुकानांवरून वाहनधारकांना पेट्रोल विकले जात असल्याचे चित्र आहे. मात्र आता पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली असून यात आणखी नफा कमावण्याच्या हेतूने अवैधरीत्या विनापरवाना किराणा दुकान व पान टपऱ्यांवर पेट्रोल विक्री होत असून चक्क १२० रुपये दराने विकले जात आहे.
विक्री करताना बिसलरी बॉटलचे माप बनवून किंवा एखाद्या डबा बनवून लीटरसाठी ८०० ते ९०० मिली पेट्रोल दिले जात आहे. उघड्यावर विकल्या जाणाऱ्या पेट्रोल विक्रीला आळा घालण्यासाठी संबंधित विभागाने पथके तैनात करून कारवाई करण्याची गरज आहे.