नियमीत कर्ज भरणा-या शेतक-यांची खंडपीठात याचिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 17:46 IST2017-08-28T15:38:43+5:302017-08-28T17:46:55+5:30

जिरायती भागागातील पाच गावांमधील शेतक-यांनी नियमीत कर्ज भरणा-यांना कर्जमाफी द्यावी़ तसेच ३१ मार्च २०१७ पर्यंत थकबाकी असलेल्या शेतक-यांनाही कर्जमाफीची सवलत द्या, अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली आहे़

A petition in the Bench of Regular Debt Relief Farmers | नियमीत कर्ज भरणा-या शेतक-यांची खंडपीठात याचिका

नियमीत कर्ज भरणा-या शेतक-यांची खंडपीठात याचिका

राहुरी : तालुक्यातील जिरायती भागागातील पाच गावांमधील शेतक-यांनी नियमीत कर्ज भरणा-यांना कर्जमाफी द्यावी़ तसेच ३१ मार्च २०१७ पर्यंत थकबाकी असलेल्या शेतक-यांनाही कर्जमाफीची सवलत द्या, अशी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली आहे़ कानडगाव, तुळापूर, वाबळेवाडी, कणगर व तांभेरे या गावातील शेतक-यांनी याचिका दाखल केली आहे़ जिरायती भागातील आणेवारी ही पाच वर्षापासून ५० पैशापेक्षा कमी आहे़ नवीन कर्ज मिळावे म्हणून शेतक-यांनी सोसायटीच्या कर्जाचे नवे-जुने केले आहे़ या शेतक-यांना शासनाच्या कर्जमाफीचा लाभ होत नाही़ केवळ २० टक्के शेतकºयांना लाभ होणार आहे़ ३० जून १६ पर्यंत थकबाकी असलेल्या शेतकºयांना काही प्रमाणात कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे़ त्याऐवजी शासनाने ३१ मार्च २०१७ पर्यंत थकबाकीचा विचार करून कर्जमाफी करावी, असे याचिकेत म्हटले आहे. याचिका दाखल करणा-यांमध्ये तुळापूर सोसायटीचे अध्यक्ष भिमराज हारदे, वाबळेवाडीचे माजी सरपंच राजाबापू वाबळे, कानडगावचे सरपंच लक्ष्मण गागरे, कणगरचे भास्कर गाडे, तांभेरे येथील संदीप मुसमाडे यांचा समावेश आहे़

Web Title: A petition in the Bench of Regular Debt Relief Farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.