बेलवंडी येथे दारुच्या नशेत विष पिऊन एका व्यक्तीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 15:29 IST2017-11-22T15:28:41+5:302017-11-22T15:29:12+5:30
बेलवंडी : दारुच्या नशेत विष घेऊन एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना बेलवंडी (ता. श्रीगोंदा ) येथे मंगळवारी रात्री आठच्या सुमारास ...

बेलवंडी येथे दारुच्या नशेत विष पिऊन एका व्यक्तीची आत्महत्या
बेलवंडी : दारुच्या नशेत विष घेऊन एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना बेलवंडी (ता. श्रीगोंदा) येथे मंगळवारी रात्री आठच्या सुमारास घडली.
प्रभाकर अश्रू शेलार (वय ४२) हे या मृत तरुणाचे नाव आहे. प्रभाकर दारूच्या आहारी गेला होता. सोमवारी दुपारी त्याचे पत्नी मंगल हिला मारहाण करतो म्हणून बेलवंडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली होती. प्रभाकर विष प्राशन करून बेलवंडी पोलीस ठाण्यात आला व तेथेच खाली पडला. पोलिसांनी त्याला नगर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु मंगळवारी रात्री उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. प्रभाकर याने यापूर्वीही दोन ते तीन वेळा दारूच्या नशेत विष सेवन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला होता, असे समजले.