जिद्दीमुळे जीवनात यश मिळतेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:21 IST2021-01-23T04:21:22+5:302021-01-23T04:21:22+5:30

: विद्यार्थ्यांमध्ये जिद्द व चिकाटी असेल तर तो जीवनात यश मिळवू शकतो त्यासाठी सातत्य आवश्यक आहे, असे प्रतिपादन डॉ. ...

Persistence brings success in life | जिद्दीमुळे जीवनात यश मिळतेच

जिद्दीमुळे जीवनात यश मिळतेच

: विद्यार्थ्यांमध्ये जिद्द व चिकाटी असेल तर तो जीवनात यश मिळवू शकतो त्यासाठी सातत्य आवश्यक आहे, असे प्रतिपादन डॉ. सुजाता लावरे यांनी केले.शारदा कन्या विद्या मंदिर राहाता येथील विद्यालयात इयता दहावीच्या विद्यर्थिनींकरिता करिअर गाईडन्स व अंतर्गत करिअर डे साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी लावरे बोलत होत्या. अध्यक्षपदी रमेश शिंदे होते.

लावरे म्हणाल्या, मेडिकल क्षेत्रात खूप संधी असून मेडिकल क्षेत्रातील लोकांनी कोरोना काळात खूप सेवा केली. इंजिनिअर, शिक्षण, मीडिया, अर्थ, कृषी, विधी इत्यादी क्षेत्रात खूप संधी आहे. यासाठी इयत्ता दहावीपासून ध्येय ठरवा. शिंदे म्हणाले, आहार व व्यायाम शारीरिक स्थिती उत्तम ठेवते व ती आपल्या प्रत्येकाची गरज आहे. वाबळे म्हणाले, आपल्याकडे सुजन क्षमता आवश्यक आहेत. आपल्याकडे कौशल्य असेल तर आपण उपाशी राहणार नाही. आपल्याकडे नावीन्य शोधण्याची क्षमता हवी. आत्मविश्वास हवा. छोटे छोटे कोर्स महत्त्वाचे आहे. गूगल आता गुरू झाला आहे म्हणून आपली क्षमता ओळखून पुढे जा. प्रास्ताविक व स्वागत मुख्याध्यापिका जयश्री ननावरे यांनी केले. सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक प्रमोद तोरणे यांनी केले तर आभार अनिता सातव यांनी केले. पर्यवेक्षक बाबासाहेब नाईकवाडी, प्राचार्य अरविंद काकडे, सुनंदा जाधव, प्रियंका नवले, किशोर जाधव, राजकुमार साळवे उपस्थित होते.

Web Title: Persistence brings success in life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.