कोपरगावात कोल्हेंचे शक्ती प्रदर्शन

By Admin | Updated: September 27, 2014 23:08 IST2014-09-27T23:03:47+5:302014-09-27T23:08:16+5:30

कोपरगाव : आपण भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला,

Performance of coal power in Kopargaon | कोपरगावात कोल्हेंचे शक्ती प्रदर्शन

कोपरगावात कोल्हेंचे शक्ती प्रदर्शन

कोपरगाव : कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील मुख्य रस्ते, ऐरणीवर असणारा पाणीप्रश्न व मागील दहा वर्षात इतर प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करून आपण भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला, असे प्रतिपादन स्नेहलता बिपीन कोल्हे यांनी केले़
स्रेहलता कोल्हे यांनी शक्तीप्रदर्शनासह उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर कोल्हे पत्रकारांशी बोलत होत्या़ यावेळी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य रवींद्र बोरावके, माजी नगराध्यक्ष राजेंद्र झावरे, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख कैलास जाधव, शहरप्रमुख भरत मोरे, रिपाइंचे दीपक गायकवाड, संजीवनीचे उपाध्यक्ष साईनाथ रोहमारे, शिवाजीराव वक्ते, अमित कोल्हे, सुमित कोल्हे, विवेक कोल्हे आदी कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या़
कोल्हे यांनी सर्वप्रथम डॉ़ बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण केला़ त्यानंतर जनसमुदायाच्या रॅलीसह उमेदवारी अर्ज दाखल केला़ कोल्हे म्हणाल्या, केंद्रात भाजपाचे सरकार आहे़ राज्यातही भाजपाचेच सरकार येणार आहे़ या तालुक्याची दहा वर्षात अत्यंत धूळधाण झाली़ येथील थांबलेल्या विकासाला चालना देण्यासाठी केंद्रातील मंत्री नितीन गडकरी यांनी मतदारसंघातून जाणाऱ्या मुख्य रस्त्यासाठी तसेच अंतर्गत रस्ते विकसित करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू, तसेच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी मतदारसंघातील ऐरणीवर आलेला पाणी व वीज प्रश्न सोडविण्याकामी येणाऱ्या भाजपा सरकारच्या माध्यमातून प्राधान्यक्रम दिला जाईल, असेही सांगितले म्हणून आजचा हा निर्णय आपण घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले़ (प्रतिनिधी)
पहिली महिला आमदार होणार
अर्ज दाखल केल्यानंतर बिपीन कोल्हे म्हणाले, या मतदार संघातून अद्यापपर्यंत एकाही महिलेला आमदारकीची संधी मिळालेली नव्हती़ महिलांचेही असंख्य प्रश्न असतात, म्हणून मतदारसंघाचे नेतृत्व करण्यासाठी सर्वांच्या संमतीने स्नेहलता कोल्हे यांना भाजपाच्या वतीने निवडणूक रिंगणात उतरविले आहे़

Web Title: Performance of coal power in Kopargaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.