कोपरगावच्या लोकप्रतिनिधींनी दहा गावांना वाऱ्यावर सोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:10 IST2021-05-04T04:10:14+5:302021-05-04T04:10:14+5:30
कोपरगाव : राहाता तालुक्यातील चितळीसारख्या गावात एक महिन्याच्या कालावधीत मृत्यूचे अर्धशतक गाठलेले आहे. ही चिंतेची बाब असून प्रशासनाने उपाययोजना ...

कोपरगावच्या लोकप्रतिनिधींनी दहा गावांना वाऱ्यावर सोडले
कोपरगाव : राहाता तालुक्यातील चितळीसारख्या गावात एक महिन्याच्या कालावधीत मृत्यूचे अर्धशतक गाठलेले आहे. ही चिंतेची बाब असून प्रशासनाने उपाययोजना करण्यासाठी कठोर पावले उचलावीत तसेच या भयंकर परिस्थितीमध्ये लोकप्रतिनिधी काय करत आहेत, असा सवाल भाजपा प्रदेश सचिव व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी उपस्थित केला आहे.
कोल्हे म्हणाल्या, कोपरगाव मतदारसंघातील रुग्णसंख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. दिवसागणिक वाढत असलेली रुग्णसंख्या ही अतिशय मोठी चिंतेची बाब असून मतदारसंघातील चितळीसारख्या गावातही अक्षरक्ष: कोरोनाने थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी. तसेच कोरोना आजाराची लक्षणे आढळल्यास त्वरित उपचार करून घ्यावे. तसेच वास्तविक पाहता लोकप्रतिनिधी व स्थानिक प्रशासनाने याबाबत उपाययोजना करणे गरजेचे होते. मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव वाढत असताना जनजागृती तसेच प्राथमिक उपचार करून रुग्णसंख्या आटोक्यात आणणे आवश्यक होते. परंतु, योग्य ते नियोजन न केल्यामुळे रुग्णसंख्या वाढत गेली. दुर्देवाने चितळीकरांवर आलेल्या या महाभयंकर संकटात अनेक ज्येष्ठ, तरुण तसेच कुटुंबातील कर्त्या व्यक्तींना प्राणास मुकावे लागले आहे. आतातरी लोकप्रतिनिधी व प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे.