रक्तदान करणारी माणसे ही समाजाची खरी श्रीमंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:14 IST2021-06-19T04:14:38+5:302021-06-19T04:14:38+5:30
मालपाणी उद्योग समूहाचे संस्थापक दामोदर मालपाणी यांच्या ४६ व्या पुण्यस्मरणदिनी शुक्रवारी (दि. १८) आयोजित रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत ...

रक्तदान करणारी माणसे ही समाजाची खरी श्रीमंती
मालपाणी उद्योग समूहाचे संस्थापक दामोदर मालपाणी यांच्या ४६ व्या पुण्यस्मरणदिनी शुक्रवारी (दि. १८) आयोजित रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. उद्योग समूहातील वरिष्ठ अधिकारी रमेश घोलप, देवदत्त सोमवंशी यांच्यासह अर्पण रक्तपेढीचे सतीश बिल्लाडे, प्रमिला कडलग आदी उपस्थित होते. मालपाणी उद्योग समूहातील ११३ कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले.
मालपाणी म्हणाले, रक्तदान एकमेव असे दान आहे की, ते गरीब व श्रीमंत असे सर्वजण करू शकतात. या दानात जीवदान देण्याचे सामर्थ्य व जादू असल्याने रक्तदानाला खूप महत्त्व आहे. या दानाचे फायदे दात्यालाही होतात आणि रुग्णालाही नवसंजीवनी मिळते. अशी दुहेरी किमया करणारे हे दान करण्यासाठी मालपाणी उद्योग समूहातील कर्मचारी नेहमीच पुढे असतात, ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे, असेही ते म्हणाले.
प्रास्ताविक रमेश घोलप यांनी केले. सकाळी दहापासून सुरू झालेल्या या शिबिरात दिवसभरात ११३ रक्त पिशव्यांचे संकलन केले.