जनतेने संयम पाळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:26 IST2021-06-09T04:26:50+5:302021-06-09T04:26:50+5:30
मंगळवारी अकोले येथे त्यांना ग्रामीण रूग्णालयात साकारत असलेल्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाची व १०० ऑक्सिजन बेड कोविड सेंटर पहाणी करत ...

जनतेने संयम पाळावा
मंगळवारी अकोले येथे त्यांना ग्रामीण रूग्णालयात साकारत असलेल्या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाची व १०० ऑक्सिजन बेड कोविड सेंटर पहाणी करत साधक सूचना केल्या. त्याच्या समवेत जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. सुनील पोखर्णा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, तहसीलदार मुकेश कांबळे, गटविकास अधिकारी दिलीप सोनटक्के, ग्रामीण रूग्णालयाचे अधीक्षक डाॅ. संजय घोगरे, प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शाम शेटे, वैद्यकीय अधिकारी डॉ. बाळासाहेब मेहेत्रे, नगरपंचायत मुुख्याधिकारी विक्रम जगदाळे आदी उपस्थितीत होते.
भोसले म्हणाले, जिल्ह्यात १४ ग्रामीण रूग्णालयात हवेतून साधारण २२ मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभे राहात आहेेत. तसेच प्रवाही १०० ऑक्सिजन बेडचे कोविड सेंटर ग्रामीण रूग्णालयात उभारले जाणार आहे. अकोलेत ग्रामीण रूग्णालयाच्या आवारात ५० बेडसाठी तात्पूर्ती शेड उभी केली जाणार आहे. ऑक्सिजन प्रकल्पासाठी विजेसाठी एक्स्प्रेस फिडर ऑक्सिजन साठवण्यासाठी १०० सिलिंडर दिले जातील. हा प्रकल्प १५जून पर्यंत सुरू होईल. टास्क फोर्सच्या सूचनेनुसार बालकांसाठीचे कोविड सेंटर उभे राहील, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दिली.
नागरिकांनी काळजी घ्यावी. बाजारपेठेत गर्दी करू नये. व्यापारी यांनी दिवसभर दुकाने चालू ठेवू नये. जनतेने भान ठेवावे, प्रशासनास सहकार्य केले तर कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी मदत होईल. तसेच तालुक्यात गावोगावी हिवरेबाजार पॅटर्न राबवावा, नगरपंचायतमध्ये प्रभाग वार हा पॅटर्न राबवावा आणि राज्यात अकोले पॅटर्न नावारुपाला यावा अशी अपेक्षा जिल्हाधिकारी यांनी यावेळी व्यक्त केली.
०८ अकोले