कोपरगावात लाडक्या बाप्पाला शांततेत निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:22 IST2021-09-21T04:22:36+5:302021-09-21T04:22:36+5:30
कोपरगाव : शहरातील घरगुती तसेच प्रशासनाच्या ‘एक गाव, एक गणपती’ असलेल्या गणेशमूर्तींचे रविवारी (दि. १९) कोपरगाव नगरपरिषद व पोलीस ...

कोपरगावात लाडक्या बाप्पाला शांततेत निरोप
कोपरगाव : शहरातील घरगुती तसेच प्रशासनाच्या ‘एक गाव, एक गणपती’ असलेल्या गणेशमूर्तींचे रविवारी (दि. १९) कोपरगाव नगरपरिषद व पोलीस प्रशासन यांच्या सुयोग्य नियोजनातून शांततेत भक्तिभावाने विसर्जन पार पडले.
शहरातील नागरिकांचे विसर्जन करण्यासाठी गैरसोय होऊ नये यासाठी शहरात विविध भागातील मुख्य सात ठिकाणी श्री गणेशमूर्ती विसर्जन रथ उभारणी करण्यात आली होती. सर्व रथ सजविले होते. अधिकारी, कर्मचारी यांनी दिवसभर मूर्तींचे संकलन केले. तसेच कायदा व सुव्यवस्थेचा समतोल राखण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या अधिकारी, कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. सायंकाळी ६ वाजता सर्व गणेशमूर्तींचे गोदावरी नदीच्या मोठ्या पुलाखाली सर्व प्रशासनाने हजर राहून भक्तिभावाने विसर्जन केले. शहरातील नागरिकांनी या ठिकठिकाणी असणाऱ्या पथकाचे कौतुक करून सत्कार करण्यात आले.
...........
पर्यावरणाची हानी होऊ नये, या अनुषंगाने नगरपरिषद प्रशासनाने गोदावरी नदीमध्ये मूर्ती विसर्जन करणे तसेच नदीमध्ये निर्माल्य टाकणे ही प्रथा कमी करून गोदावरी नदीचे संवर्धन केले आहे. त्यामुळे गोदावरी नदीचे होणारे प्रदूषण कमी होण्याच्या दृष्टीने खऱ्या अर्थाने श्रीगणेशा झाला आहे, असे म्हणता येईल.
- आदिनाथ ढाकणे, अध्यक्ष, गोदामाई प्रतिष्ठान, कोपरगाव
..........
फोटोओळी
कोपरगावात रविवारी गणेश विसर्जन शांततेत पार पडले.
........
फोटो२० - गणेशविसर्जन - कोपरगाव