गणेशोत्सवानिमित्त शांतता समितीची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:25 IST2021-09-09T04:25:54+5:302021-09-09T04:25:54+5:30
खर्डा : गणेशोत्सवानिमित्त येथील पोलीस चौकीत मंगळवारी शांतात समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी जामखेड पोलीस स्टेशनचे निरीक्षक ...

गणेशोत्सवानिमित्त शांतता समितीची बैठक
खर्डा : गणेशोत्सवानिमित्त येथील पोलीस चौकीत मंगळवारी शांतात समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी जामखेड पोलीस स्टेशनचे निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी शासनाचे नियम पाळून एक गाव एक गणपती योजना राबवली तर ती स्वागतार्ह आहे; परंतु, सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करायचा असेल तर शासनाचे दिलेले सर्व कोरोना संदर्भाचे नियम पालन करा, असे आवाहन केले.
या बैठकीस सरपंच आसाराम गोपाळघरे, उपसरपंच श्रीकांत लोखंडे, पंचायत समितीचे उपसभापती रवींद्र सुरवसे, माजी पंचायत समिती सदस्य विजयसिंह गोलेकर, ग्रामपंचायत सदस्य वैभव जमकावळे, महालिंग कोरे, दीपक जावळे, माजी सरपंच संजय गोपाळघरे, रासप युवक आघाडी तालुकाध्यक्ष गणेश सुळ, आरपीआय तालुकाध्यक्ष बाळासाहेब शिंदे पोलीस नाईक संभाजी शेंडे, अविनाश ढेरे, पोलीस हेडकॉन्स्टेबल शशिकांत मस्के, अमोल नवले, तुळशीदास गोपाळघरे, माजी ग्रामपंचायत सदस्य संतोष थोरात, विजय क्षीरसागर, विकास शिंदे गहिणीनाथ जगताप, रावसाहेब सुरवसे, फिरोज पंजाबी, अनिल धोत्रे, दत्तराज पवार, किशोर दुशी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.