सातव्या वेतन आयोगाचा थकीत पहिला हप्ता तातडीने द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:25 IST2021-08-21T04:25:25+5:302021-08-21T04:25:25+5:30
अहमदनगर : शासनाने १ जानेवारी २०१६ ते वेतन आयोग लागू होईपर्यंतची थकबाकी पाच समान हप्त्यात देण्याचे मान्य केलेले आहे. ...

सातव्या वेतन आयोगाचा थकीत पहिला हप्ता तातडीने द्या
अहमदनगर : शासनाने १ जानेवारी २०१६ ते वेतन आयोग लागू होईपर्यंतची थकबाकी पाच समान हप्त्यात देण्याचे मान्य केलेले आहे. त्यानुसार राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये सातव्या वेतन आयोगाचा पहिला हप्ता मिळाला; परंतु अहमदनगरसह राज्यातील काही जिल्ह्यांत अद्यापही सातव्या वेतन आयोगातील पहिल्या हप्त्याची रक्कम मिळालेली नाही. ती तातडीने द्यावी, अशी शिक्षक भारतीची मागणी असल्याची माहिती शिक्षक नेते तथा शिक्षक भारतीचे राज्य सचिव सुनील गाडगे यांनी दिली आहे.
वित्त विभागाने दि. ३० जून २०२१ रोजी दुसरा हप्ता देण्याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश दिलेले आहेत. इतर ठिकाणी दुसरा हप्ता मिळण्याची तरतूद होत असताना राज्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना पहिला हप्ता मिळालेला नाही, ही बाब अतिशय गंभीर आहे. शिक्षणमंत्री व वित्त विभागाचे सचिव यांच्याबरोबर शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील, राज्याध्यक्ष अशोक बेलसरे, सुभाष मोरे यांच्यासोबत झालेल्या चर्चेनुसार राज्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना सातव्या वेतन आयोगातील थकबाकीचा पहिला हप्ता तत्काळ देण्याबाबत कार्यवाही करण्याचे मान्य केले आहे. सातव्या वेतन आयोगाची थकबाकी मिळणेबाबत वित्त विभागाकडे शिक्षण सचिवांनी पाठपुरावा करावा, असेही राज्याध्यक्ष अशोक बेलसरे, राज्य सचिव सुनील गाडगे, जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप, महिला जिल्हाध्यक्ष आशा मगर, उर्दू विभागाचे जिल्हाध्यक्ष मोहमंद समी शेख, योगेश हराळे, उच्च माध्यमिकचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र आरू, जिल्हा माध्यमिकचे सचिव विजय कराळे, कार्याध्यक्ष बाबासाहेब लोंढे, उच्च माध्यमिकचे जिल्हा सचिव महेश पाडेकर, कार्याध्यक्ष किशोर डोंगरे, संभाजी पवार, हनुमंत रायकर, सुदाम दिघे, संतोष देशमुख, किसन सोनवणे, संजय तमनर, संभाजी चौधरी, नवनाथ घोरपडे, कैलास जाधव, संतोष शेंदुरकर, संजय भुसारी, सिकंदर शेख, रेवन घंगाळे, जॉन सोनवणे, महिला जिल्हाध्यक्ष आशा मगर, महिला सचिव विभावरी रोकडे, कार्याध्यक्ष मीनाक्षी सूर्यवंशी, रोहिणी भोर, शकुंतला वाळुंज, छाया लष्करे, जया गागरे, रूपाली बोरूडे, रूपाली कुरूमकर आदींनी म्हटले आहे.