पाथर्डीत रस्त्याचा दशक्रियाविधी
By Admin | Updated: August 17, 2014 23:31 IST2014-08-17T22:45:14+5:302014-08-17T23:31:56+5:30
पाथर्डी : पाथर्डी शहर ते जुना खेर्डे रस्ता दुरुस्तीकडे लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ नागरिकांनी रविवारी सकाळी रस्त्याची विधीवत पूजा करून दशक्रिया विधी केला.

पाथर्डीत रस्त्याचा दशक्रियाविधी
पाथर्डी : पाथर्डी शहर ते जुना खेर्डे रस्ता दुरुस्तीकडे लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ नागरिकांनी रविवारी सकाळी रस्त्याची विधीवत पूजा करून दशक्रिया विधी केला. या अनोख्या आंदोलनाची शहरात दिवसभर चर्चा होती.
निवेदनाची दखल नाही
या आंदोलनाचे नेतृत्व युवा नेते सोमनाथ बोरूडे यांनी केले. शहरानजीक जुना खेर्डे रस्त्यावर बालवे, साखरे, बोरुडे, केळकर व कोकाटे वस्त्या आहेत. वस्त्यांवर सुविधा मिळत नाहीत, अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत. या वस्त्यांकडे जाणारा जुना खेर्डे रस्ता खराब असल्याने नागरिकांना पायी चालणेही जिकीरीचे झाले आहे. या संदर्भात वरिष्ठांना निवेदने देऊनही कार्यवाही न झाल्याने या भागातील नागरिकांनी रस्त्याचा दशक्रिया विधी केला.
बहिष्काराचा इशारा
विधानसभा निवडणुकीपूर्वी रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास मतदानावर बहिष्कार टाकण्याचा व वस्त्यांवर कोणत्याही उमेदवाराला फिरकू न देण्याचा इशारा युवा नेते सोमनाथ बोरुडे यांनी दिला. नाना बालवे या युवकाने मुंडन करुन निषेध केला.
(तालुका प्रतिनिधी)