विशेष रेल्वेच्या नावाखाली प्रवाशांची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:23 IST2021-07-14T04:23:58+5:302021-07-14T04:23:58+5:30
स्टार ९१४ श्रीरामपूर : दौंड-मनमाड रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या पूर्वीच्याच जुन्या रेल्वेंना कोविड स्पेशलचा दर्जा देण्यात आला आहे. तिकिटाचे दरही ...

विशेष रेल्वेच्या नावाखाली प्रवाशांची
स्टार ९१४
श्रीरामपूर : दौंड-मनमाड रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या पूर्वीच्याच जुन्या रेल्वेंना कोविड स्पेशलचा दर्जा देण्यात आला आहे. तिकिटाचे दरही वाढविण्यात आले आहेत. प्रवासासाठी लागणारा वेळ व आतील सुविधा मात्र जैसे थे आहेत. त्यामुळे ही भाडेवाढ कशासाठी? असा सवाल प्रवासी संघटनांनी उपस्थित केला आहे.
गेल्या वर्षापासून कोविडचा देशात सर्वत्र कोविडचा प्रादुर्भाव झालेला आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने कोविड स्पेशल म्हणून रेल्वेंना संबोधले आहे. मात्र, त्याकरिता करण्यात आलेली भाडेवाढ आणखी किती दिवस सुरू राहणार हा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे.
----------
प्लॅटफार्म तिकीट वाढविले
रेल्वेस्थानकावर गर्दी होऊ नये, याकरिता रेल्वे प्लॅटफार्म तिकीट पूर्वी ५० रुपये करण्यात आले होते. त्यावर प्रवाशांना नाराजी व्यक्त केली. कोविडकाळात लोक आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहेत. असे असताना त्यांना तिकीट दरांत सवलत देण्याऐवजी भाडेवाढ करण्यात आल्याने संताप व्यक्त झाला. अखेर ही दरवाढ मागे घ्यावी लागली.
--------
छोट्या अंतरासाठी वाढीव दर
रेल्वे मंत्रालयाने लोकांच्या विनाकारण प्रवासाला आळा घालण्यासाठी कमी अंतरावर धावणाऱ्या रेल्वेगाड्यांचे तिकिटाचे दर वाढविले होते. हे दर दुपटीने वाढविण्यात आले होते.
-----------
जिल्ह्यातून धावणाऱ्या गाड्या
हावडा एक्स्प्रेस
गोवा एक्स्प्रेस
झेलम एक्स्प्रेस
पुणे-पाटणा
पुणे-नागपूर
कर्नाटक एक्स्प्रेस
-----------
कोविड स्पेशलचा दर्जा देण्यात आलेला आहे. तत्काळच्या दरांची अकारणी प्रवाशांकडून केली जात आहे. कोविडमुळे संकटात सापडलेल्या लोकांना आधार देण्याऐवजी त्यांच्याकडूनच एकप्रकारे लूट सुरू आहे. एसीचे दर वाढविणे एकवेळ ठीक. मात्र, सामान्य श्रेणीतील प्रवाशांना झळ बसायला नको.
-बन्सी फेरवाणी, सदस्य, बेलापूर स्थानक सल्लागार समिती
---------