राहुरी तालुक्यातील नांदूरमधून चाळीस जावयांचे पलायन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 13:00 IST2018-03-04T12:20:23+5:302018-04-03T13:00:00+5:30
धुराडीच्या दिवशी राहुरी तालुक्यातील बारागाव नांदुरमध्ये जावयांची गाढवावर बसून गावभर मिरवणूक काढण्याची प्रथा पुर्वापार चालत आली आहे.

राहुरी तालुक्यातील नांदूरमधून चाळीस जावयांचे पलायन
अहमदनगर : धुराडीच्या दिवशी राहुरी तालुक्यातील बारागाव नांदुरमध्ये जावयांची गाढवावर बसून गावभर मिरवणूक काढण्याची प्रथा पुर्वापार चालत आली आहे. मात्र शनिवारी रात्री उशीरापर्यंत जावयाचा शोध घेऊनही कुणीही न हाती लागल्याने गाढवावरून ढोल ताशा व गळ््यात चपलाची माळ घालून काढण्यात येणारी निवडणूक रद्द करण्याची वेळ गावक-यांवर आली.
गाढवावरून मिरवणूक निघणार या धास्तीने शुक्रवारी रात्रीच जावई देहू, आळंदी, पंढरपुर, गोवा, पुणे, मुंबई येथे पळून गेले. याशिवाय ब-याच जावयांनी मोबाईलही स्विच आॅप केल्याने संपर्क होऊ शकला नाही. शनिवारी बारागाव नांदुरमध्ये सकाळीच गाढव मिरवणूकीसाठी शोधण्यात आले़ ढोल ताशाही सज्ज करण्यात आला. दिवसभर गावभर जावयांची शोध मोहीम सुरू होती. गावात जावई हजर नसल्याने सापडणार कसे याची प्रचिती गावक-यांना आली. ढोल वाजंत्री जावयाच्या प्रतिक्षेत होते. रंगही तयार होता़ मात्र जावयांनी पाठ फिरविल्याने गावक-यांचा भ्रमनिरस झाला. शंभर वर्षात दुस-यांदा मिरवणूक रद्द करण्याची वेळ गावक-यांवर आली.
अशी असते जावयाची मिरवणूक
धुराडीच्या दिवशी गाढवावरून वाजतगाजत मिरवणूक काढली जाते़ जावयांच्या गळ््यात चप्पलांचा हार घातला जातो. गावकरी रंग व पाणी जावयाच्या अंगावर टाकून टिंगल करण्याची संधी घेतात. त्यानंतर जावयाला घरी नेऊन पुरण पोळीचे जेवण दिले जाते. याशिवाय जावयाला पोशाख करून घरी सन्मानाने पोहचविले जाते.