कोपरगाव : कार्यकर्त्यांच्या संघटनात्मक गुणांमुळेच पक्ष अव्वलस्थानी आहे. विकासाच्या प्रक्रियेत शेवटच्या घटकाला सामावून घेण्याचे काम फक्त आणि फक्त भाजपाकडून होत असल्याचे प्रतिपादन भाजपाचे प्रदेश सचिव लक्ष्मण सावजी यांनी केले.
कोपरगाव विधानसभा मतदारसंघात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या संकल्पनेतून भाजपाच्या कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण वर्गाचे शुक्रवारी (दि.११) आयोजन करण्यात आले होते. याप्रशिक्षण वर्गाचे प्रदेश सचिव माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. प्रशिक्षण वर्गाच्या अध्यक्षस्थानी उत्तर नगर जिल्ह्याचे अध्यक्ष राजेंद्र गोंदकर होते. यावेळी भाजपाचे माजी आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
या कार्यक्रमासाठी कोपरगाव तालुका औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे, जिल्हा संघटन सरचिटणीस नितीन दिनकर, माजी जिल्हाध्यक्ष प्रा.भानुदास बेरड, सोशल मीडियाचे राज्य संयोजक प्रवीण अलई, जिल्हा संयोजक जालिंदर वाकचौरे, ॲड. रवींद्र बोरावके, जिल्हा उपाध्यक्ष शरद थोरात, कैलास खैरे, विनोद राक्षे, सतीश चव्हाण आदींसह तालुका व शहर पदाधिकारी उपस्थित होते.
सूत्रसंचालन केशव भवर यांनी केले. तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम व शहराध्यक्ष दत्ता काले यांनी आभार मानले.
..........
१२कोपरगाव बीजेपी
...
ओळी-कोपरगाव येथील भाजपा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना लक्ष्मण सावजी. समवेत जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर.
121220\img-20201211-wa0077.jpg
कोपरगाव भाजपा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना लक्ष्मण सावजी. समवेत जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर.