शहरं
Join us  
Trending Stories
1
मुस्तफिजुर रहमानचा बांगलादेशने बदला घेतला; भारतीय अँकरला बीपीएलमधून बाहेर काढले
2
भाजपाचा काँग्रेस-एमआयएमसोबत घरोबा! CM फडणवीसांचा पारा चढला, म्हणाले, "हे चालणार नाही, १०० टक्के..."
3
एक्स गर्लफ्रेंडशी पुन्हा संबंध जोडण्यासाठी रचला कट; अपघात घडवून आणल्याचा धक्कादायक खुलासा
4
वैभव सूर्यवंशीचा धमाक्यावर धमाका! षटकार-चौकारांची 'बरसात' करत ठोकली सलग दुसरी फिफ्टी
5
Dhule: शिंदेसेनेच्या उमेदवार गीता नवले यांची फेसबुकवरून बदनामी, नेमका प्रकार काय?
6
भयंकर! सुंदर दिसण्याची ओढ बेतली जीवावर; कॉस्मेटिक सर्जरीनंतर प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरचा मृत्यू
7
"त्यांच्या कोत्या वृत्तीला राज ठाकरेंनी साथ दिली"; उद्धव ठाकरेंनी मनात राग धरून डावलल्याचा संतोष धुरींचा आरोप
8
8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगापूर्वी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी गुड न्यूज; DA-DR मध्ये होणार बंपर वाढ?
9
Nashik Municipal Election 2026 : भाजपचे आमदारच नाराज, तेथे कार्यकर्त्यांचे काय? अरविंद सावंत यांची टीका
10
अवघी ६ लाख लोकसंख्या असलेला 'हा' देश भारतासाठी अति महत्त्वाचा का आहे? कारण काय?
11
"सत्ता हेच सर्वस्व नाही, हे लोक स्वार्थासाठी..."; भाजप-काँग्रेस आघाडीवर श्रीकांत शिंदे बरसले
12
ऑस्ट्रेलियानं रचला इतिहास! १३४ वर्षांचा विक्रम मोडला; टीम इंडियाच्या वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी
13
महिला वाढल्या, कंपन्यांच्या चुका अन् खर्चही कमी झाला; 5000 कंपन्यांच्या डेटातून खुलासा
14
"मुलाला माझं नाव ठाऊक नव्हतं, पण त्याने सूरजमुळे मला ओळखलं...", रितेश देशमुखने सांगितला खास किस्सा
15
Gold Silver Rate Today: सोन्याच्या किंमतीत घसरण, मात्र चांदीच्या दरात जोरदार तेजी; खरेदीपूर्वी पटापट चेक लेटेस्ट रेट
16
मुस्लिमबहुल प्रभागांत कोण 'धुरंधर'! एआयएमआयएमने काँग्रेससमोर उभे केले कडवे आव्हान
17
सावधान! ChatGPT आणि Geminiला चुकूनही विचारू नका 'या' गोष्टी; बसू शकतो मोठा फटका!
18
SIP Calculator: दर महिन्याला ₹५,००० जमा केले तर २० वर्षांमध्ये किती फंड तयार होईल; पटापट पाहा कॅलक्युलेशन
19
VIDEO: दिल्लीच्या मशिदीजवळ रात्रभर बुलडोझरची कारवाई; बेकायदेशीर बांधकामं पाडली, दगफेकीचाही प्रकार
20
"हिंमत असेल तर या, मी तुमची वाट पाहतोय"; 'या' देशाच्या राष्ट्राध्यक्षांचं डोनाल्ड ट्रम्प यांना ओपन चॅलेंज
Daily Top 2Weekly Top 5

हिवताप निर्मुलनासाठी जनतेने सहभाग द्यावा : डॉ.पी.डी.गांडाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 13:24 IST

डासांच्यामार्फत पसरणारे आजारांमध्ये हिवताप, डेंग्युमध्ये सारखे जीवघेणे आजार होवू शकतात. म्हणूनच डासांना प्रतिबंध करणे आवश्यक आहे.

अहमदनगर : डासांच्यामार्फत पसरणारे आजारांमध्ये हिवताप, डेंग्युमध्ये सारखे जीवघेणे आजार होवू शकतात. म्हणूनच डासांना प्रतिबंध करणे आवश्यक आहे. यासाठी जिल्हा हिवताप निर्मुलनाच्या माध्यमातून जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून जनतेने ही त्यात सहभाग दिला पाहिजे. सप्ताहातून एक दिवस कोरडा दिन पाळून सहकार्य करावे, असे आवाहन हिवताप नाशिक विभागाचे सहाय्यक संचालक डॉ.पी.डी.गांडाळ यांनी केले.अहमदनगर जिल्हा हिवताप कार्यालयामार्फत २५ एप्रिल हा जागतिक हिवताप दिन साजरा करुन जनजागृती सप्ताहाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी डॉ.पी.पी.गांडाळ, जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ.संदिप सांगळे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.रजनी खुणे, लायन्स क्लबचे हरजितसिंग वधवा, संदेश कटारिया, कुष्ठरोग संचालक डॉ. शिंदे , नर्सिंग कॉलेजच्या अनिता कटारिया, डॉ.राठोड आदि मान्यवर उपस्थित होते.हिवतापाबद्दल संशोधन करणारे सर डोनल्ड रॉस यांच्या प्रतिमेच्या पूजनाने आणि दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी काढण्यात आलेल्या प्रभाग फेरीला डॉ.सांगळे, हरजितसिंग वधवा, डॉ.रजनी खुणे यांनी हिरवा झेंडा दाखविला. शहराच्या प्रमुख मार्गावरुन ही प्रभात फेरी काढण्यात आली.दरवर्षी २५ एप्रिलला हिवताप दिन साजरा होतो. डासांमार्फत होणारे वेगवेगळे आजार डेंग्यु, चिकणगुण्या, हिवतापाला आळा घातला पाहिजे, त्यासाठी गप्पी मासे पाळले पाहिजे, एक दिवसाचा हा उपक्रम न राहता वर्षभर त्याचे पालन केले पाहिजे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदिप सांगळे म्हणाले.कार्यक्रमाचे प्रास्तविकात जिल्हा हिवताप सहाय्यक संचालक डॉ.आर.डी.देशपांडे यांनी २००८ पासून जागतिक हिवताप निर्मुलन दिन साजरा होतो. या कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेपर्यंत जावून हिवताप नियंत्रण कसे करायचे याचे प्रबोधन करणे गरजेचे असल्याचे सांगितले. यावेळी उपस्थितांनी हिवताप निर्मुलनची प्रतिज्ञा घेतली. त्यानंतर वैद्यकीय अधिकारी एस.आर.सावंत, आरोग्य अधिकारी जी.एस.कर्डिले, आरोग्य सहाय्यक एस.डी.काळे, श्रीमती एम.बी.पंडीत, आणि एम.डी.वैराळ यांच्यासह अन्य कर्मचा-यांचा पुरस्काराने सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गायत्री म्हस्के यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पुरुषोत्तम आडेप, डॉ.दादासाहेब साळूंके यांच्यासह जिल्हा हिवताप कार्यालयातील कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar zpअहमदनगर जिल्हा परिषद