पोपट भगिरथ महालेची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:14 IST2021-07-09T04:14:34+5:302021-07-09T04:14:34+5:30
श्रीरामपूर : सोने व चांदीचे दागिने खरेदीसाठी आमच्या सराफ पेढीबद्दल ग्राहकांमध्ये विश्वास आहे. यामुळेच आम्ही प्रगतीपथावर आहोत, अशी ...

पोपट भगिरथ महालेची
श्रीरामपूर : सोने व चांदीचे दागिने खरेदीसाठी आमच्या सराफ पेढीबद्दल ग्राहकांमध्ये विश्वास आहे. यामुळेच आम्ही प्रगतीपथावर आहोत, अशी भावना येथील सराफ व्यावसायीक मे. पोपट भगिरथ महालेचे चालक सचिन महाले व ओम महाले यांनी व्यक्त केली.
मुख्य रस्त्यावरील राम मंदिर चौकामध्ये महाले ज्वेलर्सच्या नूतन शाखेचे उद्घाटन व्यापारी कल्याण कुंकूलोळ, शांतीलाल पोरवाल, पंचायत समिती सदस्या डॉ. वंदना मुरकुटे, पैठणचे नगराध्यक्ष सुरज लोळगे, प्रसाद व राजेंद्र लोळगे आदींच्या हस्ते फीत कापून झाले.
प्रत्येक दिवशी, प्रत्येक आठवडा व महिना खरेदीवर ग्राहकांना आकर्षक योजना देण्यात आल्या आहेत. पहिली सोडत नगरसेवक दिलीप नागरे व सोमनाथ महाले यांच्या हस्ते काढण्यात आली. यामध्ये शीतल बोरुडे या भाग्यवान विजेत्या ग्राहकास वॉशिंग मशीन बक्षीस म्हणून भेट देण्यात आली.
याप्रसंगी उपनगराध्यक्ष करण ससाणे, संजय फंड, राजेंद्र सोनवणे, भाजपाचे मारुती बिंगले, गणेश राठी, नगरसेवक दीपक चव्हाण, वैशाली चव्हाण, ज्ञानेश्वर मुरकुटे, विजय देडगावकर, अशोक कानडे, बंडुकुमार शिंदे, साजिद शेख, भारती कांबळे, रावसाहेब बोरुडे, चंद्रकला डोळस, अनंतराव पतंगे, डॉ. कृपाल देशपांडे, प्रकाश चित्ते, सोमनाथ कदम, भागवत उपाध्ये, बाळासाहेब आगे, प्रवीण गुलाटी, राजेंद्र शाह, संजय पांडे उपस्थित होते. ज्योती महाले, रोहिणी महाले, श्रावणी महाले, योगिता सोनार, शिवम सोनार यांनी स्वागत केले. (वा.प्र.)
------
फोटो ओळी : महाले ज्वेलर्स
पोपट भगिरथ महाले ज्वेलर्सचे नवीन शाखेचे उदघाटन करताना मान्यवर
------