पारनेरमध्ये कांद्याला तीनशे रुपयांनी वाढ
By Admin | Updated: June 5, 2014 00:07 IST2014-06-04T23:18:02+5:302014-06-05T00:07:45+5:30
पारनेर : पारनेर तालुका बाजार समितीत बुधवारी चांगल्या कांद्याला क्विंटलमागे तीनशे रूपयांनी भाववाढ मिळून एकवीसशे रूपये भाव मिळाल्याची माहिती सभापती काशिनाथ दाते यांनी दिली.
पारनेरमध्ये कांद्याला तीनशे रुपयांनी वाढ
पारनेर : पारनेर तालुका बाजार समितीत बुधवारी चांगल्या कांद्याला क्विंटलमागे तीनशे रूपयांनी भाववाढ मिळून एकवीसशे रूपये भाव मिळाल्याची माहिती सभापती काशिनाथ दाते यांनी दिली. भावात थोड्या प्रमाणात वाढ झाल्याने शेतकर्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. पारनेर बाजार समितीत गेल्या दोन आठवड्यापासून कांद्याला क्विंटलमागे आठशे ते बाराशे रूपये भाव मिळत होता. शेतकर्यांना चांगल्या कांदयाला भाव मिळावा अशी अपेक्षा होती. रविवारी अठराशे रूपयांवर गेलेला कांद्याला बुधवारी तीनशे रूपये वाढ झाल्याचे सभापती दाते यांनी सांगितले. बाजार समितीत सुमारे बारा हजार कांदा गोण्यांची आवक झाली. यामध्ये मध्यम ते चांगला यासह इतर प्रकारचे कांदे आले होते. गेल्या काही दिवसांमध्ये देशाच्या दक्षिण भागात अवकाळी पावसाने कांद्याचे नुकसान झाल्याने महाराष्ट्रातील कांद्याला भाव मिळत असल्याचे सचिव सुभाष कावरे यांनी सांगितले. पारनेर बाजार समितीचा कांद्याला बाहेरील राज्यात चांगली मागणी आहे, परंतु शेतकर्यांनी ओला कांदा आणू नये असे आवाहन संचालक व व्यापारी संघाचे तालुकाध्यक्ष मारूती रेपाळे यांनी केले आहे. शेतकर्यांनी कांदा थेट शेतात विक्री केल्यास व्यापार्यांंकडून फसवणूक होण्याची शक्यता असून त्यामुळे बाजार समितीत आणूनच कांदा विक्री करावा, असे आवाहन संचालक प्रशांत गायकवाड यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)