पारनेर : नगरपंचायत निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी बनविण्याचे काम सुरू असतानाच राज्य निवडणूक आयोगाने ही यादी प्रसिद्धीसाठी स्थगिती दिली. त्यामुळे १५ मार्च रोजी प्रसिद्ध होणारी यादी लांबणीवर पडली असून, निवडणूकही लांबणीवर गेली आहे.
नगरपंचायत निवडणुकीसाठी प्रभागनिहाय मतदार यादी १५ मार्चला प्रसिद्ध होणार होती. मात्र, राज्यात हरकतींची वाढती संख्या आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादी प्रसिद्ध करण्यास स्थगिती दिली. नगरपंचायतकडून बोगस मतदार, दुबार मतदार, नवीन नाव नोंदणी केलेले. मात्र, शहरात राहत नसलेले मतदार, मयत मतदार, एका प्रभागामधून दुसऱ्या प्रभागात नावे गेलेले मतदार यांच्या हरकतींबाबत माहिती मागविली होती.
नगरपंचायतीने ही माहिती जिल्हाधिकारी कार्यालयात केली. त्यानंतर, ती निवडणूक आयोगाकडे जाणार आहे. हरकतींचा राज्यातील आढावा घेतल्यानंतर, निवडणूक आयोग स्वतंत्रपणे अंतिम मतदार यादीसाठी तारीख जाहीर करणार आहे.
---
नगरपंचायत मतदार यादी बाबत बोगस नावे, दुबार नावे व इतर हरकतींची माहिती निवडणूक आयोगास पाठविली आहे. आयोगाने प्रसिद्धची तारीख निश्चित केल्यावर अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल.
- सुनीता कुमावत, मुख्याधिकारी, नगरपंचायत, पारनेर