पिंपळगाव माळवी येथील पार्कला मिळणार मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:16 IST2021-06-25T04:16:41+5:302021-06-25T04:16:41+5:30

महापौर बाबासाहेब वाकळे यांचा कार्यकाळ ३० जून रोजी संपुष्टात येत आहे. महापौर वाकळे यांच्या कार्यकाळातील शेवटची सभा शुक्रवारी बोलविण्यात ...

The park at Pimpalgaon Malvi will get approval | पिंपळगाव माळवी येथील पार्कला मिळणार मंजुरी

पिंपळगाव माळवी येथील पार्कला मिळणार मंजुरी

महापौर बाबासाहेब वाकळे यांचा कार्यकाळ ३० जून रोजी संपुष्टात येत आहे. महापौर वाकळे यांच्या कार्यकाळातील शेवटची सभा शुक्रवारी बोलविण्यात आली आहे. या सभेत पिंपळगाव तलाव परिसरात पार्क उभारण्याचा प्रस्ताव नगररचना विभागाकडून सादर केला जाणार आहे. या प्रस्तावाला सभेची मंजुरी घेऊन तो नगरविकास खात्याला पाठविण्यात येणार आहे. यासह अन्य महत्त्वाचे विषय सभेसमोर आहेत. यापूर्वी स्थायी समितीची सभा दुपारी १२ वाजता होणार आहे. ही सभा संपल्यानंतर १२ वाजून ३० मिनिटांनी दुसरी सभा होणार आहे. या सभेसमोर सावेडी अमरधाम येथील ऑक्सिजन प्रकल्प उभारण्यासाठी प्राप्त झालेल्या निविदांना अंतिम मंजुरी देण्याचा विषय आहे. तसेच महिला बालकल्याण समितीचीही सभा सकाळी होणार आहे. या सर्व सभा ऑनलाईन घेण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Web Title: The park at Pimpalgaon Malvi will get approval