पारगावला झाडाचा वाढदिवस साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:26 IST2021-08-20T04:26:40+5:302021-08-20T04:26:40+5:30

यावेळी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी रामदास हराळ, निर्मला रामदास हराळ यांची उपस्थिती होती. हराळ यांच्या हस्ते गावातील पहिली ...

Pargaon celebrates tree birthday | पारगावला झाडाचा वाढदिवस साजरा

पारगावला झाडाचा वाढदिवस साजरा

यावेळी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी रामदास हराळ, निर्मला रामदास हराळ यांची उपस्थिती होती. हराळ यांच्या हस्ते गावातील पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, मिठाई, मास्क, झाडांची रोपे वाटप करण्यात आली. यासाठी माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक बाबासाहेब बोडखे यांनी हा उपक्रम स्वखर्चातून राबविला. यावेळी संचालक महेंद्र हिंगे, सविता हिंगे, प्रा. सतीश सातपुते, बबन भोसले, अर्जुन बोडखे, भाऊसाहेब पांडुळे, धर्मा बोठे, सोमा बोठे, आदिनाथ नेटके, विराज बोडखे आदी उपस्थित होते. यावेळी हराळ म्हणाले, पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना शिक्षण आणि पर्यावरणाचे महत्त्व समजावे यासाठी साहित्याचे वाटप करण्यात आले. झाडांचा वाढदिवस साजरा करणे म्हणजे ते झाड वाढविण्याची जबाबदारी लावणाऱ्याने स्वीकारली तरच पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होणार आहे.

---

फोटो- १९ पारगाव

नगर तालुक्यातील पारगाव मौला येथे झाडाचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यानिमित्त मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी रामदास हराळ, निर्मला हराळ, बाबासाहेब बोडखे आदी.

Web Title: Pargaon celebrates tree birthday