कोरोना आढावा बैठकीसाठी नगरचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री मुश्रीफ आले असता पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांवर शंभर कोटीचा आरोप केला. त्याची तातडीने दखल घेऊन चौकशी करण्यात आली. मग, आता परमबीर सिंग यांच्यावरील हे आरोप हजारो कोटींच्या घोटाळ्याचे आहेत. शिवाय त्यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याच्याही तक्रारी येत आहेत. परमबीर यांच्या तक्रारीची तातडीने दखल घेण्यात आली. दुसरीकडे सचिन वाझेवरही कारवाई झाली. मग, आता परमबीर यांच्यावर जे आरोप झाले आहेत, त्याची तातडीने चौकशी करण्याची गरज आहे, असे मंत्री मुश्रीफ म्हणाले.
--------
भाजपच्या लोकांनाच रेमडेसिविर कसे मिळते?
राज्यात रेमडेसिविर इंजेक्शन मिळविण्यासाठी ओढाताण सुरू आहे. लोक रांगा लावून इंजेक्शन मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, भाजपच्या लोकांना हे इंजेक्शन सहजासहजी कसे मिळते? केंद्र सरकार त्यांच्यावर एवढे मेहरबान कसे, असे म्हणत मुश्रीफ यांनी भाजपचे खासदार सुजय विखे यांना टोला लगावला.