एमआयडीसी परिसरात घरफोड्या करणारा पप्पू गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 17:19 IST2018-05-27T17:17:53+5:302018-05-27T17:19:28+5:30
एमआयडीसी परिसरात घरफोड्या करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी अटक केली़ पप्पू परसराम काळे (वय ३५ रा. वडगाव गुप्ता ता. नगर) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.

एमआयडीसी परिसरात घरफोड्या करणारा पप्पू गजाआड
अहमदनगर: एमआयडीसी परिसरात घरफोड्या करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी अटक केली़ पप्पू परसराम काळे (वय ३५ रा. वडगाव गुप्ता ता. नगर) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.
काळे याने १२ डिसेंबर २०१७ रोजी एमआयडीसी परिसरातील विखे पाटील हॉस्पिटलजवळ असलेल्या दिनेश भास्कर काळे यांच्या घरी चोरी करून २२ हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शनिवारी पप्पू काळे हा एमआयडीसी परिसरात येणार असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. पोलीस निरिक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरिक्षक डॉ़ शरद गोर्डे, सुधीर पाटील, कॉस्टेबबल बाळासाहेब मुळीक, योगेश गोसावी, अण्णा पवार, रवींद्र कर्डिले यांच्या पथकाने काळे याला सापळा लावून अटक केली. पुढील तपासाठी काळे याला एमआयडीसी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. काळे याने नगर शहर व परिसरात आणखी घरफोड्या केल्याचे समोर आले असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.