एसटी बसवर चिटकविले छत्रपती संभाजीनगरचे फलक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:05 IST2021-01-08T05:05:23+5:302021-01-08T05:05:23+5:30

यावेळी मनविसेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा, अनिकेत शियाळ, संकेत जरे, सुमित शिर्के, हामजा शेख, दीपक मगर, योगेश चंगेडिया, प्रमोद जाधव ...

Panels of Chhatrapati Sambhajinagar pasted on ST bus | एसटी बसवर चिटकविले छत्रपती संभाजीनगरचे फलक

एसटी बसवर चिटकविले छत्रपती संभाजीनगरचे फलक

यावेळी मनविसेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा, अनिकेत शियाळ, संकेत जरे, सुमित शिर्के, हामजा शेख, दीपक मगर, योगेश चंगेडिया, प्रमोद जाधव आदींसह मनसे विद्यार्थी सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना सुमित वर्मा म्हणाले, औरंगाबादच्या नामांतरणाचा विषय गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. याबाबत केंद्र व राज्य सरकारही बोटचेपीची भूमिका घेत आहे. नागरिकांच्या भावनांचा विचार करता संभाजीनगर असे नामकरण करणे गरजेचे आहे. आज अनेक योजनांना, चौकांना सत्ताधारी व विरोधक आपआपल्या नेतृत्वाचे नाव देत आहेत; परंतु नागरिकांच्या भावनांचा आदर करून औरंगाबादला आता ‘छत्रपती संभाजीनगर’ हे नाव द्यावे. या मागणीबाबत मनसेने वेळोवेळी पाठपुरावा केला; परंतु त्याबाबत कोणताही निर्णय झाला नाही. म्हणून आज नगरमध्ये औरंगाबादला जाणाऱ्या एसटी बसवर ‘छत्रपती संभाजीनगर’ नावाचे फलक चिकटविले आहेत. याची दखल घेऊन लवकरात लवकर नामांतर व्हावे, अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा वर्मा यांनी दिला. यावेळी कार्यकर्त्यांना नगरधून औरंगाबादला जाणाऱ्या एस.टी.बसेसवर संभाजीनगरचे फलक लावून ‘छत्रपती संभाजी महाराज की जय’च्या घोषणा दिल्या.

फोटो ०६ मनसे

ओळी- नगर येथे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्यावतीने औरंगाबादला जाणाऱ्या एस.टी.बसवर छत्रपती संभाजीनगर नावाचे फलक चिटकविण्यात आले.

Web Title: Panels of Chhatrapati Sambhajinagar pasted on ST bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.