पाण्यासाठी हंडा मोर्चा
By Admin | Updated: May 11, 2016 00:10 IST2016-05-11T00:10:25+5:302016-05-11T00:10:26+5:30
संगमनेर : दुष्काळस्थितीत पंचायत समितीतर्फे पाणी पुरवठा करणारा टँकर अचानक बंद झाल्याने मंगळवारी पिंपळगाव देपा गावातील संतप्त महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा नेला.

पाण्यासाठी हंडा मोर्चा
संगमनेर : दुष्काळस्थितीत पंचायत समितीतर्फे पाणी पुरवठा करणारा टँकर अचानक बंद झाल्याने मंगळवारी पिंपळगाव देपा गावातील संतप्त महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा नेला.
दुष्काळात पठार भागातील टंचाईग्रस्त पिंपळगाव देपा गावाला पंचायत समितीमार्फत एका टँकरने पाणी पूरवठा केला जात होता. पाच दिवसांपूर्वी काही ग्रामस्थांचे पाण्यावरून टँकर चालकाशी प्रचंड वाद झाले. त्यामूळे त्रस्त झालेल्या चालकाने अचानक टँकर बंद केला. परिणामी गावात निर्जळी झाली. या प्रकाराने संतप्त झालेल्या महिलांनी आज दुपारी भर उन्हात ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा नेला.
महिलांनी सरपंच रामदास ढेरंगे व ग्रामसेवक पांडुरंग फड यांना जाब विचारला. यावेळी ढेरंगे यांनी महिलांना समजविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्या ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हत्या.
अखेर ग्रामसेवक फड यांनी त्वरित पंचायत समितीकडे टँकरविषयी कळविल्यावर महिला शांत झाल्या.
मोर्चात उषा उंडे, छाया घाणे, पुष्पा खरात, अशोक खरात, सोपान उंडे, निलेश उंडे, गौतम खरात, अतुल खेमनर, बापूसाहेब खरात, श्रीकांत घाणे, सचिन गुंड, संजय भोसले, अमोल उंडे, तान्हाजी शिंदे आदींसह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
(प्रतिनिधी)