चित्रकार जगताप यांच्या चित्रांची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:20 IST2021-03-28T04:20:01+5:302021-03-28T04:20:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : भारतातील दोन मानाच्या राष्ट्रीय कला स्पर्धांचा निकाल नुकताच जाहीर आला आहे. त्यातील द बॉम्बे ...

चित्रकार जगताप यांच्या चित्रांची
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : भारतातील दोन मानाच्या राष्ट्रीय कला स्पर्धांचा निकाल नुकताच जाहीर आला आहे. त्यातील द बॉम्बे आर्ट सोसायटी (मुंबई) आयोजित १२९ वे कला प्रदर्शन तसेच आर्ट सोसायटी ऑफ इंडिया आयोजित १०३ वे कला प्रदर्शन अशा दोन्ही स्पर्धांसाठी अहमदनगर येथील युवा चित्रकार प्रमोद जगताप यांच्या दाेन चित्रांची निवड झाली आहे. जगताप यांचे ब्रिदिंग लाईट्स नावाचे चित्र द बॉम्बे आर्ट सोसायटीसाठी तसेच ब्रिदिंग लाईट्स-४ नावाचे चित्र आर्ट सोसायटी ऑफ इंडियासाठी निवडले आहे. प्रत्येक स्पर्धेमध्ये संपूर्ण भारतातून सुमारे ४ हजार स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्यातून केवळ ३५० ते ४०० कलाकारांच्या चित्रांची निवड करण्यात आली. दोन्ही चित्रांमध्ये जगताप यांनी दैनंदिन जीवनात दिसणाऱ्या जुन्या पण मोहक अशा इमारती रोजची कामाची लगबग त्यातील छाया प्रकाशाची गंमत कलात्मकरीत्या चित्रित केली आहे. निवड झालेल्या सर्व चित्रांचे प्रदर्शन हे त्या-त्या संस्थांच्या संकेत स्थळावर २५ मार्चपासून सुमारे १ महिन्यापर्यंत पाहण्यासाठी उपलब्ध असणार आहे.
२७ प्रमोद जगताप