कष्टातून निर्माण होणारी कलाकृती यश देते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2016 01:09 IST2016-10-17T00:33:48+5:302016-10-17T01:09:07+5:30
अहमदनगर : समाजाकडे डोळसपणे पाहून एकरूप होऊन काम केले तर कष्टातून निर्माण होणारी कलाकृती आपल्याला जगासमोर घेऊन जाते़ हेच मोठे यश असते़

कष्टातून निर्माण होणारी कलाकृती यश देते
अहमदनगर : समाजाकडे डोळसपणे पाहून एकरूप होऊन काम केले तर कष्टातून निर्माण होणारी कलाकृती आपल्याला जगासमोर घेऊन जाते़ हेच मोठे यश असते़ असे मत दिग्दर्शक व अभिनेते गिरीष कुलकर्णी यांनी व्यक्त केले़
येथील सीएसआरडी संस्थेत लघुपट व माहितीपट निर्मिती शाखेतील विद्यार्थ्यांसाठी कुलकर्णी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते़ यावेळी संस्थेचे संचालक डॉ़ सुरेश पठारे, प्रा़ संजय भट, प्रा़ देवाशिष शेडगे, मकरंद सप्तर्षी, श्रीकांत यादव आदी उपस्थित होते़
कुलकर्णी म्हणाले, आज सर्वत्र माध्यमांचा विस्फोट झाला आहे़ आपल्या जीवनात तंत्रज्ञानाने घुसखोरी केली आहे़ मानवी संवेदना बोथट होत आहेत़
या संवेदना जपणे ही काळाची गरज आहे़ लघुपट व माहितीपट अभ्यासक्रमातून पुढील दिशा मिळेल असे ते म्हणाले़ पठारे म्हणाले, संस्थेतील पहिल्या बॅचमधील ३८ विद्यार्थ्यांनी ५ लघुपटांची निर्मिती केली आहे़
चित्रपट क्षेत्राविषयी मूलभूत माहिती मिळावी या उद्देशातून हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला असल्याचे ते म्हणाले़ यावेळी प्रा़ सॅम्युअल वाघमारे प्रा़ कैलास जाधव, प्रा़ ज्ञानेश कुलकर्णी आदी उपस्थित होते़
(प्रतिनिधी)