नोटाबंदीनंतर मोठ्या मिनतवारीनंतर रिझर्व्ह बँकेने अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ३५० कोटी रुपये स्वीकारले आहेत. पण अजूनही १२ कोटी रुपयांची रकम रिझर्व्ह बँकेकडून स्वीकारली जात नसल्याने बँकेतच पडून आहे. ...
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकरी कर्जमाफीचा याद्यांवर याद्या पाठविण्याचा पाढा अजूनही सुरूच आहे. दरम्यान जिल्हा बँकेने सहकार आयुक्तांकडे मार्गदर्शन मागितल्यानंतर तब्बल ९१ अपात्र शेतक-यांची नावे वगळण्यात आली आहे. त्यामुळे कर्जमाफी ...
ऊस तोडणी कामगारांसोबत स्थलांतरित होणा-या शालेय मुलांचे सर्वेक्षण जिल्हा परिषदेने सुरू केले असून, जिल्ह्यातील ९३७ मुलांचे स्थलांतर रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे. या मुलांना हंगामी वसतिगृह योजनेंतर्गत दरमहा आर्थिक मदत केली जाणार आहे. त्यामुळे आई-वडील ...
शेवगाव तालुक्यातील बालमटाकळीसह मुरमी, बाडगव्हाण, शेकटे, सुकळी, हातगाव, गायकवाड जळगाव, कांबी, मुंगी, लाड-जळगाव, बोधेगावसह परिसरात बोंड अळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्याने या भागातील कपाशी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. ...
उडीद, मका, ऊस यासह शेतक-यांच्या विविध प्रश्नावर काँग्रेसने सुरु केलेले आमरण उपोषण तहसीलदरांच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. मंगळवारी हे आमरण उपोषण सोडण्यात आले. ...
महापालिकेने रविवारी मध्यरात्री रेल्वे स्टेशन परिसरातील दोन आणि सांगळे गल्लीतील तीन अशी पाच मंदिरे भुईसपाट केली. आतापर्यंत २१ मंदिरावरील कारवाई पूर्ण केली आहे. मल्हार चौकात एका तरुणाने गोंधळ घातल्याने पोलीस आणि मनपा पथकाची एकच धावपळ झाली. ...
नगर शहर व परिसरात प्रवाशांना लुटणा-या दरोडेखोरांच्या दोन वेगवेगळ्या टोळ्या स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी रात्री जेरबंद केल्या आहेत. यामध्ये एकूण पाच आरोपींना अटक करत त्यांच्याकडून हत्यारांसह ४१ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ...
पृथ्वीतलावर तसूभरही जागेची मालकी स्वत:च्या नावावर नसणा-यांना जगण्यासाठी करावा लागणारा संघर्ष अन निवा-यासाठी लागणा-या जागेसाठी सातत्याने होणारी अवहेलना लास्ट स्टॉप या नाटकातून मांडण्यात आली आहे ...
राजकारणाला नकार देणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना भावी पत्रकारांच्या बालचमूनं घटकाभरासाठी का होईना पंतप्रधान होणे भाग पाडले. मी पंतप्रधान ... ...