एका वर्षात सत्तेला लाथ मारून शिवसेना स्वबळावर सत्तेवर येईल. सत्तेला लाथ कधी मारायची हे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ठरवतील. मात्र त्यानंतर तुम्ही सर्वजण एकजुटीने राहून परिवर्तन घडवून आणा असं आवाहन युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले आहे. ...
बेलापूर-श्रीरामपूर रस्त्यावर बेलापूर खुर्दजवळ बुधवारी रात्री सव्वा बारा वाजता तीन वाहनांमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात पाच तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. ...
बेकायदा वाळू उपसा रोखण्यासाठी गेलेल्या तहसीलदार भारती सागरे यांच्यावर डिझेल ओतून ठार मारण्याचा प्रयत्न वाळू तस्करांनी केला. ही घटना बुधवारी दुपारी पारनेर तालुक्यातील कोहकडी येथील कुकडी नदीपात्रात घडली. ...
संपदा नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाविरूद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल असताना सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील संचालक मंडळाच्या मदतीला धाऊन आले आहेत. राज्यमंत्र्यांनी ठेवीदारांचे पैसे परत देण्यासाठी मार्ग काढण्याऐवजी थेट हस्तक्षेप करीत फेरलेखापरीक ...
विरोधकांचे आंदोलन व भाषणबाजी ही त्यांची मजबुरी आहे. लोकांनीच त्यांच्यावर सोपवलेली जबाबदारी ते पार पाडीत आहेत. सरकार त्यांच्याकडे लक्ष न देता शेतक-यांकडे लक्ष देत आहे, अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मंगळवारी नागपूरमध्ये निघालेल्य ...
वंजारवाडी येथील विंचरणा नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधा-याचे अतिदाबामुळे दोन लोखंडी दरवाजे सोमवारी रात्री बाराच्या सुमारास पाण्याच्या लोंढ्यात वाहून गेले. हे बंधारे तब्बल ३६ तासानंतर बसविण्यात यश आले असून, बंधा-यात अवघे आता २० टक्के पाणी उरले आहे. ...
पोलीस असल्याचे भासवून राहुरी तालुक्यातील कापूस व्यापा-याचा वाहनासह १३ लाख रुपयांचा ऐवज लुटून नेल्याची घटना नेवासा फाटा परिसरात रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. ...