पायजमा, नेहरू शर्ट, डोक्यात टोपी अन् गळ्यात उपरणे अशा पोषाखातील शेतकरी गेल्या १६ वर्षापासून ऊस शेतीवर संशोधन करीत आहे. साधे राहणीमान असलेल्या व्यक्तिमत्त्वाने ८६०३२ या वाणावर संशोधन करून इशुदंडू ज्ञानेश्वर-१६ हा उसाचा वाण तयार केला आहे. ...
खडकवाडी (ता. पारनेर) येथे पूर्ण दाबाने व अखंडित वीज पुरवठा करावा, या प्रमुख मागण्यांसाठी खडकवाडी येथील ग्रामस्थांनी सोमवारी विद्युत उपकेंद्राच्या कर्मचा-यांना दोन तास कोंडले. ...
‘बियाणे बँक ’ बनविणा-या दुर्गम आदिवासी भागातील कोंभाळणे येथील राहीबाई सोमा पोपेरे यांना कृषी विभागाच्या आत्मा प्रकल्पांतर्गत आदर्श शेतकरी पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. ...
हरभरा खरेदी केंद्र जामखेड येथे सुरू करावे, कुकडीचे पाणी, तालुक्यातील प्रभारी राज यासह विविध प्रश्नांवर शिवसेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...
राहाता तालुक्यातील केलवड गावातील शाम उर्फ राहुल साहेबराव जटाड (वय २३) या युवकाचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास मयताच्या घराशेजारील शरद राधुजी गमे यांच्या शेततळ्यात त्याचा मृतदेह आढळला. ...
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारा भाजपचा माजी महापौर श्रीपाद छिंदम याला महाराष्ट्रातून हद्दपार करावे, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी हजारो शिवप्रेमींनी नगरमध्ये मंगळवारी (दि़ ३) शिवसन्मान मोर्चा काढला. ...
तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या ५८ व्या गळीत हंगामात तनपुरे पिता पुत्रांविरोधात आमदार शिवाजी कर्डिले व डॉ. सुजय विखे यांच्यात कलगीतुरा रंगला. कारखान्यात मी हात घातला असून पुन्हा कारखाना विरोधकांच्या ताब्यात जाऊ देणार नाही, अशी घोषणा विखे यांनी केली. ...