मागील महिन्यात झालेले अर्थसंकल्पीय अधिवेशन विरोधकांच्या आडमुठ्या धोरणामुळे वाया गेले. त्यामुळे त्याचा निषेध म्हणून जिल्हा भाजपने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन केले. याशिवाय भाजप खासदारांनी महिनाभराचे मानधन सरकारला परत केले. अहमदनगर जिल्हाधि ...
सापाबरोबर केलेली स्टंटबाजी कर्जत तालुक्यातील बहिरोबावाडीतील युवकाच्या जीवावर बेतली. घरासमोर आढळून आलेल्या सापाला पकडण्याच्या स्टंटबाजीत सापाने कडकडून दंश केल्याने शिवाजी गेणबा लष्कर (वय २८) यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची दु:खद घटना घडली. सोमवारी ...
नगर शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात गाराच्या पावसाला सुरुवात झाली आहे. अचानकपणे वादळी वा-यासह गाराच्या पावसाला सुरुवात झाल्याने शेतक-यांची धावपळ उडाली आहे. ...
श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव, तांदळी दुमाला, घुगलवडगाव, देऊळगाव, घोडेगाव आणि परिसरातील सुमारे पाच हजार हेक्टर क्षेत्राला कुकडीचे पाणी देणारी चारी क्रमांक १२ ची दुरवस्था झाल्यामुळे हक्काच्या पाण्यापासून शेतकरी वंचित आहेत. ...
पाणी फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत लोकसहभाग वाढत असून, लोकसहभागातून गावांना पाणीदार बनवा, असे आवाहन पाणी फाउंडेशनचे अध्यक्ष अभिनेते आमिर खान यांनी केले़ मागच्या दोन स्पर्धेत ज्या गावांनी सहभाग घेतला, त्या गावांत ...
शहरातील महापालिका क्षेत्रात अनधिकृपणे उभारलेल्या फलकांवर महापालिका प्रशासनाने कारवाई सुरु केली आहे. याबाबत ‘लोकमत’ने सातत्याने पाठपुरावा केला होता. याची दखल घेत प्रशासनाने मोहिम हाती घेतली आहे. ...
संगमनेर तालुक्यातील चिंचपूर दुर्गापूर येथील एका शेतक-यावर बिबट्यानं हल्ला केला. या हल्ल्यात सुनिल सखाराम गवारे जखमी झाले आहे. बिबट्यानं सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झाला. ...
जिल्हांतर्गत बदलीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत आज बुधवारी संपत आहे़ मात्र बदलीपात्र शिक्षकांच्या याद्यांचा गोंधळ अद्याप सुरूच असून, आता जिल्हास्तरावर याद्या प्रसिद्ध करण्याचा आदेश शिक्षण विभागाला मंगळवारी सायंकाळी प्राप्त झाला आहे. त्यामुळे प्रक्रिया ...