पोलीस अधीक्षक कार्यालयातील तोडफोडप्रकरणी स्वत:हून पोलिसांत हजर झालेल्या राष्ट्रवादीच्या ४२ कार्यकर्त्यांना गुरूवारी न्यायालयाने जामीन मंजूर केला. प्रत्येकी पंधरा हजार रूपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मिळाला. ...
महानगरपालिकेच्या पथदिवे घोटाळ्यातील मुख्य आरोपी पालिकेतील विद्युत विभागाचा प्रमुख रोहिदास सातपुते याच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आली. ...
वाळू तस्करांना खबर देणा-या चार खब-यांवर नेवासा तहसीलदार उमेश पाटील यांनी कारवाई केली. संदीप सुरेश जाधव, समीर इसाक इनामदार, विलास मच्छिंद्र पवार, राजेंद्र शंकर धनवटे या चार खब-यांना अटक करण्यात आली असून न्यायालयीन कोठडी सुनावली. ...
देशात व राज्यात दररोज इंधनाचे दर वाढत असून, सरकार याद्वारे सामान्य जनतेची लूट करत आहे. यामुळे सरकारविरोधात जनतेतून तीव्र असंतोष उमटत आहे. सरकारच्या या इंधन दरवाढीविरोधात शहर काँग्रेसच्या वतीने गुरूवारी दुपारी ‘दे धक्का’ आंदोलन करण्यात आले. ...
राजकीय कारणावरून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शिवसेनेचे विद्यमान नगरसेवक योगिराज गाडे व राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर यांनी पोलिसांत परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत. ...
निर्धारित नियतनापेक्षा कमी धान्य वितरण केल्याच्या कारणावरून जिल्हा पुरवठा विभागाने तब्बल ८७८ स्वस्त धान्य दुकानदारांवर धडक कारवाई केली आहे. यात सात दुकानांचे परवानेदेखील निलंबित करण्यात आले आहेत. ...
पोपटराव पाटील यांनी सतर्कता दाखवून परवाना असलेल्या बंदुकीतून केलेला गोळीबार व पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे पाटील यांच्या तालुक्यातील माळेवाडी येथील वस्तीवर दरोड्याचा प्रयत्न फसला. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. ...
महाराष्ट्र शासनाच्या रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाच्या सदस्यपदी नगरच्या प्रवीण तथा पी.डी. कुलकर्णी, अमित बैंचे व चैत्राली जावळे या तीन जणांची तीन वषार्साठी नियुक्ती झाली आहे. सुप्रसिद्ध अभिनेते अरुण नलावडे यांची अध्यक्षपदी फेरनियुक्ती करण्यात आली ...