नेवासा ते खडकाफाटा रस्त्यावरील गजानन आॅइल मिल जवळ लपून बसलेले दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चार दरोडेखोरांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले तर एक जण पसार झाला. ...
पुण्यश्लोक अहिल्यादेवी या उत्तम प्रशासक होत्या. त्यांच्या जीवनातील एकतारी गुण आपण जीवनात अंगिकारला पाहिजे. धनगर समाजाचा आरक्षणाचा विषय अभ्यासपूर्ण मांडायला हवा त्यानंतर तो लोकसभेत बहुमताने संमत झाल्यानंतरच हा प्रश्न सुटू शकेल. ज्या मल्हारराव होळकरांच ...
सुमारे चार कोटींचा कर भरूनही केडगावकरांच्या वाट्याला अंधार आला आहे.केडगाव उपनगरातील विविध वसाहतीत असणारे दिव्यांचे खांब बंद पडून महिने लोटले तरी त्याकडे कोणी पाहण्यास तयार नाही.नगर-केडगाव मार्गावरील निम्म्याहून अधिक पथदिवे बंद पडले आहेत.अंधारामुळे अप ...
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जन्मगावी चोंडी (ता. जामखेड) येथे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांचे भाषण चालू असताना बहुजन एकता परीषदेचे अध्यक्ष डॉ. इंद्रकुमार भिसे व त्यांच्या सहका-यांनी सभेत गोंधळ घातला. कार्यकर्त्यांना आव ...
जिल्ह्यातील वाळू तस्करांची मुजोरी ठेचण्याऐवजी जिल्हाधिकारी मात्र बैठकांमध्ये व्यस्त आहेत. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे कार्यकर्ते अॅड. श्याम असावा यांना वाळू तस्करांनी धमकी दिली. या प्रकरणी निवेदन देण्यासाठी गेलेल्या स्वयंसेवी संस्थांच्या महास ...
सांसद आदर्श ग्राम योजनेत खासदारांनी दत्तक घेतलेल्या शेवगाव तालुक्यातील कांबी गावच्या सरपंच सविता अशोक मस्के, व सदस्य सुरेशचंद्र होळकर यांनी कार्यकाळात ग्रामपंचायतचे हित जोपासण्याबाबत कर्तव्यात कसूर केल्याने त्यांना ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३९ ...
सत्ता आल्यानंतर वर्षभरात धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन देणाऱ्या भाजपा सरकारने गेली चार वर्षे ‘टिस’च्या (टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायसेन्स) अहवालाचा संदर्भ देत वेळकाढूपणा केल्याने राज्यभरातील धनगर समाज संतप्त झाला आहे. गुरूवारी (दि़३१) चोंडी ...
नगर जिल्ह्यात बेसुमार वाळूउपसा सुरु असताना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी काहीही कारवाई करायला तयार नाहीत. त्यामुळे वाळूतस्करांचे धाडस वाढले असून एका वाळूतस्कराने मंगळवारी थेट ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे कार्यकर्ते अॅड. शाम आसावा यांना धमकी दिली ...