अवर्षणग्रस्त असलेल्या अहमदनगर जिल्ह्याला यंदा पावसाअभावी बुरे दिन आले आहेत. येत्या पाच दिवसात पाऊस विश्रांती घेणार असल्याचा अंदाज राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे खरीप हंगाम वाया गेल्यात जमा आहे. ...
मारहाण व दमदाटीप्रकरणी पाथर्डी बाजार समितीचे माजी सभापती गहिनीनाथ शिरसाठ यांच्यासह त्यांच्या दोन भांवाना जिल्हा न्यायालयाने १ वर्षाच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे़ जिल्हा व सत्र न्यायाधीश वी़वी़ बांबर्डे यांनी हा निकाल दिला़ ...
राज्यातील जे दलित नेते व्यापक राजकारण करु पाहत होते त्यात अॅड. प्रेमानंद रुपवते यांच्या नावाचा समावेश होतो. ‘सदाबहार’ आणि गांधी-आंबेडकरी विचारधारेचे पाईक ही त्यांची ओळख होती. दादासाहेब रुपवते यांचा वैचारिक वारसा त्यांनी समर्थपणे चालविला. त्यांचे शनि ...
१९१८ सालचा तो १० आॅगस्टचा दिवस होता. वार शनिवार म्हणजे अकोल्याच्या बाजारचा दिवस. अकोल्याच्या पंचक्रोशीतील व आदिवासी भागातील चार-पाच हजाराचा समुदाय अकोल्यात जमा झालेला. या जमावाने त्यावेळच्या जुलमी मामलेदाराला कु-हाडी, काठ्यांचे घाव घालून ठार मारले. य ...
जगातल्या ५२ देशात आणि भारतातील १०० शहरात निराधाराची भूक भागविणाऱ्या राबिनहूड आर्मी या सामाजिक संस्थेने नगर शहरातही उपक्रम सुरू करून गरिबांपर्यंत अन्न पोहोचविण्याचे काम सुरू केले आहे. शहरात विविध क्षेत्रात कार्यरत असलेले २० सदस्य सध्या या सामाजिक उपक् ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार सर्वांचे प्रश्न सोडविणारे असल्याचे जनतेच्या लक्षात आल्याने जळगाव व सांगली महापालिकांची सत्ता भाजपाला मिळाली. ...
प्रवरा नदीपात्रात वाळूने भरलेला ट्रक्टर राहुरी पोलिसानी चिंचोली परिसरात पकडला, मात्र वाळू तस्करांनी पोलिसांच्या ताब्यातून ट्रक्टर पळवून हातावर तु-या दिल्याची घटना काल घडली. यासंदर्भात राहुरी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...