नवपद आराधनेत सम्यक पद तपाला महत्व आहे. सिध्दचक्र तपसाधनेमुळे दिव्य अनुभव प्राप्त होतात. मंत्र, यंत्र, लब्धी आदी शक्तिशाली तत्वाचा या तपसाधनेत समावेश आहे. सिध्दचक्र तपाने मन:शांती मिळते. ...
मुळा धरण पुन्हा १०० टक्के भरल्यानंतर मुळा धरणाचे ११ दरवाजे मंगळवारी उघडण्यात आले आहे़ नदीपात्रात १ हजार १०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे़ नदीतील डिग्रस येथील कोल्हापूर पध्दतीचा बंधार पूर्ण क्षमतेने भरला असून मानोरी बंधाºयात पाणी सोडले आहे. ...
बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार तर महिला जखमी झाली. ही घटना संगमनेर तालुक्यातील कुरण गावच्या शिवारात सोमवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली. राधाबाई दिलीप मोरे असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. ...
पारनेर तालुक्यातील उत्तर भागाला वरदान ठरणारे मांडओहोळ धरण मंगळवारी सकाळी तुडुंब भरले. गेल्या अनेक वर्षांनंतर हे धरण भरल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. ...
मुळा पाणलोटात पुन्हा पाऊस झाल्याने मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. यामुळे धरणाचे ११ दरवाजे पुन्हा उघडले आहेत. धरणातून १ हजार १०० क्युसेकने पाणी नदीपात्रात सोडले आहे. दरम्यान नगर शहर व परिसरात सोमवारी रात्री व मंगळवारी रात्री झालेल्या जोरदार पाऊस झ ...
Maharashtra Election 2019: माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांनी ईव्हीएमची पूजा केल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
विधानसभा निवडणुकीत अहमदनगर जिल्ह्यात सोमवारी पाच वाजेपर्यंत ६३ टक्के मतदान झाले. किरकोळ घटना वगळता मतदान शांततेत सुरू होते. सायंकाळी पाचनंतर मतदान केंद्रावर रांगा लागल्या होत्या. तर नगर, पारनेर परिसरात पाऊस सुरू झाल्याने मतदानासाठी व्यत्यय येत होता. ...
मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास बंदी असतानाही मतदान करतानाचा व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना पाथर्डी तालुक्यातील डांगेवाडी मतदान केंद्रावर घडली. तर श्रीगोंदा मतदारसंघात मतदारांना पैसे वाटप करताना दो ...
जामखेड तालुक्यातील बांधखडक येथे मतदानाला जात असताना भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटात शाब्दिक चकमकीतून हाणामारी झाली. यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांवर केलेल्या चाकू हल्ल्यात दोन जखमी झाले आहेत. यामुळे संतप् ...