पद्मश्री विखे कारखाना कामगार पतपेढीच्या कर्मचाऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:16 IST2021-07-11T04:16:02+5:302021-07-11T04:16:02+5:30
विखे पाटील कारखान्याच्या कामगार पतपेढीच्या रेशन दुकानात चंद्रसेन नोकरीत होते. सतत हसतमुख आणि सर्वांशी प्रेमाने वागणारी व्यक्ती म्हणून त्यांची ...

पद्मश्री विखे कारखाना कामगार पतपेढीच्या कर्मचाऱ्याची आत्महत्या
विखे पाटील कारखान्याच्या कामगार पतपेढीच्या रेशन दुकानात चंद्रसेन नोकरीत होते. सतत हसतमुख आणि सर्वांशी प्रेमाने वागणारी व्यक्ती म्हणून त्यांची प्रवरानगर परिसरात ओळख होती. शुक्रवारी (दि.९) सकाळी ९.३० ते दुपारी २ वाजण्याच्या दरम्यान प्रवरानगर परिसरातील आहेर वस्ती भागातील एका झाडाला गळफास लावलेल्या अवस्थेत चंद्रसेन आढळून आले. तोडकर कुटुंबीयांनी त्यांच्या घरातील कपड्यांची तपासणी केली असता, त्यांना एक चिठ्ठी त्यांना मिळाली. त्यात आपल्या मृत्यूचे कारण त्यांनी लिहून ठेवले होते.
या चिठ्ठीत गेल्या अनेक दिवसांपासून मला खूप मानसिक त्रास दिला जात असून, माझ्या कार्यालयाचे मॅनेजर आणि काही कर्मचारी यांच्या जाचाला कंटाळून मी आत्महत्या करीत आहे. माझ्या मृत्यूला हेच लोक जबाबदार आहेत, असे स्वतःच्या हस्ताक्षरात त्यांनी लिहून ठेवले होते. लोणी पोलिसांना माहिती मिळताच, त्यांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला. शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
100721\img-20210710-wa0113.jpg
प्रवरानगर येथील पद्मश्री डॉ. विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या कामगार पतपेढीतील कर्मचारी चंद्रसेन सखाराम तोडकर