पाडळी रांजणगाव संस्था राष्ट्रवादीकडे
By Admin | Updated: July 13, 2016 00:33 IST2016-07-13T00:09:10+5:302016-07-13T00:33:45+5:30
पारनेर : तालुक्यातील पाडळी रांजणगाव विविध कार्यकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे युवक अध्यक्ष विक्रमसिंह कळमकर, सरपंच वैशाली करंजुले,

पाडळी रांजणगाव संस्था राष्ट्रवादीकडे
पारनेर : तालुक्यातील पाडळी रांजणगाव विविध कार्यकारी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे युवक अध्यक्ष विक्रमसिंह कळमकर, सरपंच वैशाली करंजुले, सुरेश उबाळे यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनलने तब्बल पंधरा वर्षानंतर ९ जागा जिंकून एक हाती सत्ता हस्तगत केली. तर सत्ताधारी शेतकरी विकास पॅनलला अवघ्या ४ जागांवर समाधान मानावे लागले.
सत्ता मिळविण्यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे युवक तालुकाध्यक्ष विक्रमसिंह कळमकर, सरपंच वैशाली करंजुले, माजी सरपंच अप्पासाहेब साठे, सुरेश उबाळे, भाऊ उबाळे, आप्पासाहेब कळमकर, सदाशिव साठे, बबनराव करंजुले, संगम साठे, खंडू खेसे, गोरख जाधव, भास्कर पाटील व ग्रामपंचायत सदस्यांनी विजयासाठी विशेष परिश्रम घेतले.
परिवर्तन पॅनलचे विजयी उमेदवार- मारुती उबाळे, देवराम करंजुले, दादाभाऊ घावटे, किरण साठे,वसंत जाधव, ईश्वरा साठे, नवनाथ उघडे, आशाबाई करंजुले, मंजुळा कळमकर तसेच शेतकरी विकास पॅनलचे ताराचंद करंजुले, भास्कर करंजुले, दत्तात्रय उबाळे, अरुण उबाळे हे चार उमेदवार निवडून आले.