ऑक्सिजनयुक्त कार्डियाक रुग्णवाहिका सुरू करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:21 IST2021-05-07T04:21:18+5:302021-05-07T04:21:18+5:30
सध्या देशासह संपूर्ण राज्यात कोरोना संसर्गाने थैमान घातलेले आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध होत ...

ऑक्सिजनयुक्त कार्डियाक रुग्णवाहिका सुरू करावी
सध्या देशासह संपूर्ण राज्यात कोरोना संसर्गाने थैमान घातलेले आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याने रुग्णांचे तसेच त्यांच्या नातेवाइकांचे प्रचंड हाल होत आहेत. खाजगी रुग्णवाहिकांकडून कोरोना पेशंटची अक्षरशः लूट सुरू असून काही रुग्णवाहिका रुग्णांना वेठीस धरून रुग्णांकडून मनमानी पद्धतीने भाडे आकारत आहे. या अडचणींचा विचार करून राज्यात नावाजलेल्या व ब वर्ग दर्जा असलेल्या श्री हरिहर केशव गोविंद बन संस्थानने परिसरातील रुग्णांसाठी अद्ययावत ऑक्सिजनयुक्त कार्डियाक रुग्णवाहिका उपलब्ध करून द्यावी.
या वैश्विक महामारीच्या काळात संस्थानचे योगदान अत्यंत गरजेचे असून परिसरातील बेलापूर बुद्रुक, बेलापूर खुर्द, उक्कलगाव, आंबी, अंमळनेर, केसापूर, दवणगाव आदी पंचक्रोशीतील रुग्णांसाठी व त्यांच्या नातेवाइकांसाठी या रुग्णवाहिकेचा फायदा होईल. यामुळे लवकरात लवकर आपल्या नावलौकिक प्राप्त संस्थानमार्फत रुग्णवाहिकेची उपलब्धता व्हावी, अशी विनंती रोडे यांनी केली आहे. या निवेदनाची प्रत रोडे यांनी धर्मादाय उपायुक्त, जिल्हाधिकारी, श्रीरामपूर उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, बेलापूर खुर्दचे सरपंच, ग्रामविकास अधिकारी यांना पाठवली आहे.