पारनेर ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:22 IST2021-05-26T04:22:16+5:302021-05-26T04:22:16+5:30

पारनेर : पारनेर ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन प्लाण्टच्या उभारणीस सुरुवात झाली असून, तेथे ऑक्सिजनचे १०० बेड असलेली सुविधा तसेच आणखी ...

Oxygen plant at Parner Rural Hospital | पारनेर ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट

पारनेर ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट

पारनेर : पारनेर ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन प्लाण्टच्या उभारणीस सुरुवात झाली असून, तेथे ऑक्सिजनचे १०० बेड असलेली सुविधा तसेच आणखी एक अ‍ॅब्म्युलन्स उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे मंगळवारी आमदार नीलेश लंके यांनी सांगितले.

लंके यांनी सांगितले की, कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठीही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. पहिल्या लाटेत कर्जुले हर्या व दुसऱ्या लाटेत सध्या भाळवणी येथे कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. या सेंटरमधून सहा हजारांपेक्षा जास्त रुग्ण उपचार घेऊन परतले आहेत तर सध्या सुमारे एक हजार रुग्ण उपचार घेत आहेेत. रुग्णांची गैरसोय होऊ नये, त्यांना आवश्यक ते सर्व उपचार तालुक्यातच मिळावेत, यासाठी आता ग्रामीण रुग्णालयात १०० ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. ऑक्सिजनची कमतरता भासू नये, यासाठी तेथेच ऑक्सिजन प्लाण्ट उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले असून, या प्लाण्टमधून दररोज ऑक्सिजनचे १२५ सिलिंडर उपलब्ध होणार आहेत. या प्लाण्टसाठी १७ लाख रुपये किमतीचे जनरेटरही बसविण्यात येणार आहे. रुग्णांसाठी आणखी एक रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे आ. लंके यांनी सांगितले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीषा उंदरे, डॉ. बाळासाहेब कावरे उपस्थित होते.

अंत्यसंस्कारासाठी गॅसदाहिनी

कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी अनंत अडचणी येत असून, त्यावर मात करण्यासाठी पारनेर शहरातील स्मशानभूमीत आधुनिक गॅसदाहिनी उभारण्यात येत असून, लवकरच तिचा वापर सुरू होईल, असेही आ. लंकेे यांनी सांगितले.

Web Title: Oxygen plant at Parner Rural Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.