नगर जिल्ह्यातील तब्बल ३७ रुग्णांची कोरोनावर मात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 13:01 IST2020-07-03T13:01:03+5:302020-07-03T13:01:47+5:30
अहमदनगर जिल्ह्यातील ३७ कोरोनाग्रस्त रुग्ण शुक्रवारी (दि.३ जुलै) बरे होऊन घरी परतले. आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला, आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली.

नगर जिल्ह्यातील तब्बल ३७ रुग्णांची कोरोनावर मात
अहमदनगर : जिल्ह्यातील ३७ कोरोनाग्रस्त रुग्ण शुक्रवारी (दि.३ जुलै) बरे होऊन घरी परतले. आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला, आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाढे यांनी दिली.
अहमदनगर महानगरपालिका क्षेत्रातील ३२, अकोले तालुका २, जामखेड, राहाता, संगमनेर तालुक्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
दरम्यान, जिल्ह्यात शुक्रवारी ३७ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. यामुळे जिल्ह्यातील बºया झालेल्या रुग्णांची संख्या आता ३७० इतकी झाली आहे, अशी माहिती डॉ.गाढे यांनी दिली.