शासकीय रक्तपेढीतून दिली रुग्णाला कालबाह्य रक्तपिशवी

By Admin | Updated: November 6, 2016 00:20 IST2016-11-06T00:20:47+5:302016-11-06T00:20:47+5:30

येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रक्तपेढीतून रुग्णालयातीलच रुग्ण महिलेला चक्क कालबाह्य रक्तपिशवी देण्यात आली.

Out of blood transfusion, a patient with unexpected blood transfusion | शासकीय रक्तपेढीतून दिली रुग्णाला कालबाह्य रक्तपिशवी

शासकीय रक्तपेढीतून दिली रुग्णाला कालबाह्य रक्तपिशवी


अहमदनगर : नगर कारखाना अडचणीत असताना त्याला आ़ कर्डिले यांनी कर्ज मिळू दिले नाही. १३ संचालकांना घेऊन कर्डिले तत्कालीन सहकारमंत्र्यांना भेटले व कारखाना अवसायनात काढा अशी शिफारस केली. त्यामुळे कारखान्याचे वाटोळे आ. कर्डिले यांनीच केले, असा आरोप माजी खा. दादा पाटील शेळके यांनी परिषदेत केला.
दादा पाटील शेळके यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेस महाआघाडीचे नेते प्रा.शशिकांत गाडे, सभापती संदेश कार्ले, ज्ञानदेव दळवी, सूर्यभान पोटे, कैलास अडसुरे, भरत बोडखे, विश्वास जाधव आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना दादा पाटील शेळके म्हणाले, जिल्ह्यातील बहुतांशी सर्वच कारखान्यांवर कर्ज आहे. गळीत हंगामासाठी कारखाने सहकारी बँकेकडे कर्ज मागतात. सर्व कारखान्यांना सहकारी बँकेने कर्ज दिले, पण नगर कारखान्याला नाकारले, ते कर्डिले यांच्या सांगण्यावरूनच. कर्डिले त्यावेळी बँकेचे चेअरमन होते. कारखाना बंद पडावा, ही त्यांची इच्छाच होती. बँकेचे प्रतिनीधी म्हणून ते कारखान्यावर संचालक होते. त्यांनी त्यावेळच्या १३ संचालकांना घेऊन तत्कालीन सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांना कारखाना मोडीत काढण्याची शिफारस केली होती. दादा पाटलांनी कारखाना मोडीत काढला, हा आ. कर्डिले यांचा आरोप साफ खोटा आहे. हे सांगतानाच कर्डिले यांनीच दूध संघ मोडीत काढला. आ. कर्डिले यांनी शेतकऱ्यांसाठी एकही संस्था उभी केली नाही, मात्र आहे त्या संस्था मोडल्या.
(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Out of blood transfusion, a patient with unexpected blood transfusion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.