घनकचरा, सांडपाणी या विषयावर राष्ट्रीय लघुपट निर्मिती स्पर्धेचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:16 IST2021-07-16T04:16:00+5:302021-07-16T04:16:00+5:30
या स्पर्धेत दोन वेगवेगळ्या भागातील विषयात लघुपट निर्मिती करून स्पर्धकाने आपली माहिती ईमेल आयडीसह यू ट्युबवर २० जुलै २०२१ ...

घनकचरा, सांडपाणी या विषयावर राष्ट्रीय लघुपट निर्मिती स्पर्धेचे आयोजन
या स्पर्धेत दोन वेगवेगळ्या भागातील विषयात लघुपट निर्मिती करून स्पर्धकाने आपली माहिती ईमेल आयडीसह यू ट्युबवर २० जुलै २०२१ पर्यंत माय जीओव्ही डाॅट ईन या संकेस्थळावर अपलोड करावी. स्पर्धेतील भाग एकमध्ये जैव विघटनशील कचरा व्यवस्थापन, प्लास्टिक कचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन, मैल गाळ, वर्तणूक बदल असे विषय असतील, तर भाग दोनमध्ये वाळवंट क्षेत्र, डोंगराळ प्रदेश, सागरी किनारपट्टी लगतचा प्रदेश, मैदानी भाग, पूर प्रवण क्षेत्र असे विषय आहेत. यासाठी भरघोस बक्षिसे आहेत.
ग्रामपंचायती, समुदाय आधारित संस्था, स्वयंसेवी संस्था, बचत गट, तसेच नागरिक या स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. लघुपटांचा कालावधी कमीत कमी १ ते ५ मिनिटे असावा. केवळ ग्रामीण भागातील वातावरण निर्मिती केलेले लघुपट या स्पर्धेसाठी स्वीकारले जातील. स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन जल जीवन मिशनचे प्रकल्प संचालक परीक्षित यादव यांनी केले आहे.