संविधान जागर ऑनलाइन व्याख्यानमालेचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:21 IST2021-01-23T04:21:46+5:302021-01-23T04:21:46+5:30
व्याख्यानमालेच्या पहिल्या दिवशी शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील यांचे लोकशाही समाजवाद, दुसऱ्या दिवशी एस.एम. जोशी फाउंडेशनचे कार्यकारी विश्वस्त प्रा. ...

संविधान जागर ऑनलाइन व्याख्यानमालेचे आयोजन
व्याख्यानमालेच्या पहिल्या दिवशी शिक्षक भारतीचे आमदार कपिल पाटील यांचे लोकशाही समाजवाद, दुसऱ्या दिवशी एस.एम. जोशी फाउंडेशनचे कार्यकारी विश्वस्त प्रा. सुभाष वारे यांचे स्वातंत्र्य आणि समता, तिसऱ्या दिवशी लोकमत अहमदनगर आवृत्तीचे संपादक सुधीर लंके यांचे सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, चौथ्या दिवशी प्राचार्या स्मिता पानसरे यांचे समता तर पाचव्या दिवशी साहित्यिक आमदार लहू कानडे यांचे संविधान संस्कृती या विषयावर व्याख्यान होणार आहे. सर्व मान्यवरांची व्याख्याने जय हिंदच्या ऑनलाइन पेजवर प्रसारित करण्यात येणार आहेत. याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार डॉ. तांबे यांनी केले आहे.
...........
खताळ हरहुन्नरी
दिवंंगत खताळ यांचे विशेष परिश्रम
संदीप खताळ हे एक हरहुन्नरी तरुण होते. गत महिन्यात त्यांचे अकस्मात निधन झाले. ही घटना सर्व संगमनेरकरांसाठी अत्यंत दु:खदायक होती. जय हिंद लोकचळवळीच्या वतीने आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठी दिवंंगत खताळ यांचे विशेष परिश्रम होते.
खताळ यांची स्मृती म्हणून संविधान जागर ऑनलाइन व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे, असेही आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी सांगितले.