शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

राहुरीत मल्चींगवर सेंद्रीय टरबूज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 14:00 IST

भाजीपाला व फळांवर मोठ्या प्रमाणावर औषधांची फवारणी केल्याने ग्राहकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दुसऱ्या बाजूला सेंद्रीय शेती करण्याकडे शेतक-यांचा कल वाढू लागला आहे. हळूहळू सेंद्रीय भाजीपाला व फळांची मागणी ग्राहक करू लागले आहेत. त्यादृष्टिकोनातून ब्राम्हणी येथील शेतकरी वसंतराव ठुबे यांनी एक एकर क्षेत्रावर मल्चींग करून टरबुजाचे पीक घेतले आहे. सेंद्रीय टरबुजाला चांगली बाजारपेठही उपलब्ध झाली आहे.

ठळक मुद्देशेतकरी वसंतराव ठुबे यांची यशोगाथा

भाऊसाहेब येवलेराहुरी : भाजीपाला व फळांवर मोठ्या प्रमाणावर औषधांची फवारणी केल्याने ग्राहकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दुसऱ्या बाजूला सेंद्रीय शेती करण्याकडे शेतक-यांचा कल वाढू लागला आहे. हळूहळू सेंद्रीय भाजीपाला व फळांची मागणी ग्राहक करू लागले आहेत. त्यादृष्टिकोनातून ब्राम्हणी येथील शेतकरी वसंतराव ठुबे यांनी एक एकर क्षेत्रावर मल्चींग करून टरबुजाचे पीक घेतले आहे. सेंद्रीय टरबुजाला चांगली बाजारपेठही उपलब्ध झाली आहे.

वसंतराव ठुबे यांनी जमिनीची उभी, आडवी नांगरट केली़ चार ट्रॉली शेणखत टाकले़ निंबोळी खताच्या १० गोण्याचा वापर केला. सहा बाय सव्वा या आकारात टरबुजाची लावणी केली. त्यासाठी शुगर किंग या टरबुजाच्या वाणाची निवड केली. बेड तयार करून त्यावर ठिबकच्या नळया टकल्या़ त्यावर मल्चींग पसरविण्यात आले. टरबुजाची लागवड केल्यानंतर दही व गोमूत्र ठिबकव्दारे देण्यात आले. मल्चींगवर छिद्र पाडून टरबुजाबरोबरच मिरचीचीही लागवड केली. एकरी चोवीस टन टरबूज निघाले. आणखी दोन तोडे होणार आहे.शासनाने अहमदनगर येथे कृषी महोत्सवाचे आयोजन केले होते. कृषी महोत्सवात वसंतराव ठुबे यांनी टरबुजाचा स्टॉल लावला होता. सेंद्रीय टरबूज असल्याने ग्राहकांनी मोठ्या प्रमणावर टरबुजाला मागणी केली. ७० हजार रूपयांची विक्री कृषि महोत्सवात झाली. कृषि महोत्सवामुळे टरबुजाला चांगले मार्केट मिळाले.

राहुरी व ब्राम्हणी येथेही सेंद्रीय टरबुजाला चांगली मागणी होती. ग्राहक खुश झाले व चांगल्या प्रकारे वसंतराव ठुबे यांना अर्थप्राप्ती झाली. ठिबक व मल्चींगचा वापर केल्याने पाण्याची बचत झाली़ गवत कमी प्रमाणावर आले. रोगाचा प्रादुर्भावही कमी झाला, याशिवाय टरबुजाचे दर्जेदार उत्पादनही घेता आले. विद्राव्य खते ठिबकच्या माध्यमातून देता आले. टरबुज पीक घेताना मिरचीचेही आंतरपीक घेण्यात आले. टरबुजाचे पीक संपण्याच्या मार्गावर असताना मिरचीचा तोडा सुरू झाला आहे. मिरचीला ५० रूपये किलो याप्रमाणे भाव मिळत आहे. टरबूज व मिरची पीक घेताना वसंतराव ठुबे यांना शिवकुमार कोहकडे व डी.पी.गिरी यांचे मार्गदर्शन लाभले.बहुपीक पध्दतीवसंतराव ठुबे हे शेतामध्ये एकाच पिकावर अवलंबून राहत नाही. टरबूज-मिरची पिकांबरोबरच त्यांनी कांदा बीज उत्पादन घेतले, ऊस, कांदा व गहू ही पिके घेतली.बहुपीक पध्दती अवलंबिल्यामुळे एखाद्या पिकाला कमी भाव मिळाल्यास त्याची कसर दुस-या पिकातून भरून निघते.शेतीमालाचे भाव कोसळत असताना ग्राहकांची गरज ओळखून विविध पीक घेण्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे,असे ठुबे यांनी सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरFarmerशेतकरी