नगर एमआयडीसीचे प्रश्न सोडविण्याचा आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:21 IST2021-08-29T04:21:51+5:302021-08-29T04:21:51+5:30
अहमदनगर : येथील नागापूर औद्योगिक वसाहतीच्या विस्तारीकरणासह अन्य प्रश्न तातडीने सोडविण्याचा आदेश उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिला. महसूलमंत्री बाळासाहेब ...

नगर एमआयडीसीचे प्रश्न सोडविण्याचा आदेश
अहमदनगर : येथील नागापूर औद्योगिक वसाहतीच्या विस्तारीकरणासह अन्य प्रश्न तातडीने सोडविण्याचा आदेश उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिला.
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, एमआयडीसीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक कृष्णा आदी उपस्थित होते.
या बैठकीत ट्रक टर्मिनलची भूखंड क्रमांक ३६ वर उभारणी करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. एमआयडीसीचे विभागीय अधिकारी नाशिकमध्ये बसतात. नगरमधील उद्योजकांना सातत्याने नाशिकला खेटे मारावे लागतात. उद्योजकांचा हा त्रास दूर व्हावा, यासाठी नगर एमआयडीसीतील क्षेत्रीय व्यवस्थापक यांना अधिक अधिकार दिल्यास उद्योजकांना नाशिकला जावे लागणार नाही. यासंदर्भातही कार्यवाही करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. दुहेरी कर आकारणीबाबत उद्योजकांनी प्रश्न मांडला होता. दोन भिन्न यंत्रणांकडून कर वसूल न करता एकाच यंत्रणेकडून कर वसूल करावा. तसेच कराची रक्कम ग्रामपंचायत व एमआयडीसीची प्रशासकीय यंत्रणा यांच्यात योग्यरित्या वाटप करण्याबाबत पावले उचलण्याच्या सूचनाही यावेळी करण्यात आल्या असल्याचे काळे यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.
......
फोटो: २७ एमआयडीसी