सहकार मंत्र्यांचे चौकशीचे आदेश
By Admin | Updated: July 13, 2016 00:35 IST2016-07-13T00:08:34+5:302016-07-13T00:35:15+5:30
काष्टी : काष्टी (ता.श्रीगोंदा) येथील काष्टी सहकारी सोसायटीला शासनाने सहकार महर्षी पुरस्काराने सन्मानित केले आहे.

सहकार मंत्र्यांचे चौकशीचे आदेश
काष्टी : काष्टी (ता.श्रीगोंदा) येथील काष्टी सहकारी सोसायटीला शासनाने सहकार महर्षी पुरस्काराने सन्मानित केले आहे. संस्थेची वार्षिक उलाढाल १०० कोटीची असताना नफा फक्त ६४ लाख व सभासद संख्या ५४२ आहे. संस्थेत सभासदावरुन अडवा अडवीचे धोरण घेतले जात आहे, असा आरोप भाजपा महिला आघाडीच्या नेत्या सुवर्णा पाचपुते यांनी केला.
संस्थेच्या सभासदत्वासाठी सुवर्णा पाचपुते यांनी सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे धाव घेतली आहे. सहकार मंत्र्यांनी हे प्रकरण तपासून कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्हा उपनिबंधक दिगंबर हौसारे यांनी सुवर्णा पाचपुते यांनी सुचविलेल्या व्यक्तिंना सभासद करून घेण्यासाठी आपल्या स्थरावर कार्यवाही करावी, असे आदेश दिले आहेत.
सुवर्णा पाचपुते म्हणाल्या, काष्टी सहकारी सोसायटीत आमचे सासरे सभासद आहेत. आम्ही खातेफोड करुन संस्थेकडे सभासद करून घेण्यासाठी अर्ज केला होता, परंतु आमचा सभासद होण्याचा हक्क हिरावून घेण्यात आला. काष्टी सोसायटीची वार्षिक उलाढाल १०० कोटीच्या घरात आहे , मात्र नफा ६४ लाखाचा कसा होतो? लहान लहान संस्थाचा नफा कोटीच्यावर गेला आहे. काष्टी सोसायटीला आशिया खंडातील एक अग्रेसर सोसायटी म्हणून सहकार महर्षी पुरस्कार दिला पण सोसायटीत कारभार कसा चालतो ? सभासद किती आहेत हे पाहणे गरजेचे होते असेही त्या म्हणाल्या.
(वार्ताहर)