फळबागांच्या विमा परताव्याचे ट्रिगर बदलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:16 IST2021-06-03T04:16:13+5:302021-06-03T04:16:13+5:30
या पीक विमा योजनेमध्ये चालू वर्षापासून मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले. विशेषतः फळबागांच्या पीक विमा योजनेतून कमी पावसाचे ट्रिगर ...

फळबागांच्या विमा परताव्याचे ट्रिगर बदलले
या पीक विमा योजनेमध्ये चालू वर्षापासून मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले. विशेषतः फळबागांच्या पीक विमा योजनेतून कमी पावसाचे ट्रिगर हटविण्यात आले आहे. जास्त पावसाबरोबर आर्द्रतेचा ही समावेश यामध्ये करण्यात आला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील सगळ्याच तालुक्यातील शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. कारण जिल्ह्यातील बहुतांशी तालुके पर्जन्यछायेखालील अवर्षणग्रस्त व कमी पावसाचे आहे. डाळिंब फळबागांच्या नवीन पीक विमा प्रस्तावात १५ जुलै ते १५ डिसेंबर दरम्यान जास्त पाऊस व आर्द्रतेचा तीन ट्रिगर करण्यात आल्या आहेत. यामध्ये किमान परतावा मिळण्यासाठी सलग पाच दिवस प्रतिदिन २५ मिमी. पाऊस पडणे आवश्यक आहे. दैनंदिन आर्द्रता ही ८५ टक्क्यांच्या पुढे नोंदली जाणे आवश्यक आहे. म्हणजेच या पाच दिवसात सव्वाशे मिमी. पाऊस होणे आवश्यक आहे. तसेच या पावसाचा दैनिक कालावधी वाढत गेल्यास नुकसान भरपाई सुद्धा वाढणार आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांत तरी कोणत्याही तालुक्यात सलग पाच दिवस २५ मिमी. पेक्षा जास्त पाऊस अद्याप झालेला नाही. त्यामुळे विम्याच्या परताव्याचे भवितव्य जवळपास संपुष्टात आले आहे. फळबाग पीक विमा योजनेचे परतावे अन्यायकारक पावसाच्या भागातील शेतकऱ्यांसाठी मिळतील याचीही शक्यताही आता धूसर आहे. केवळ कंपनीच्या एकतर्फी हिताची पर्जन्यछायेखालील अवर्षणग्रस्त कमी योजना असल्याची या निमित्ताने समोर आहे.
जुन्या फळबाग विमा योजनेत १५ जुलै ते १५ ऑगस्ट फळधारणा काळ तसेच १६ ऑगस्ट ते १५ ऑक्टोबर फळवाढीचा काळ या कालावधीत पावसाचा खंड व कमी पाऊस या ट्रिगरचा समावेश होता. त्यामुळे या दुष्काळी व कमी पावसाच्या भागातील फळबागा या अडीच महिन्यात कमी पावसाच्या ट्रिगरमध्ये पात्र होत होत्या. मात्र सुधारित फळबाग योजनेत कमी पावसाचा ट्रिगर काढल्याने शेतकऱ्यांना फळबागांच्या पीक विम्याचे परतावे मिळणे आता अशक्य आहे. फळबाग पीक विमा योजना अन्यायकारक पावसाच्या भागातील शेतकऱ्यांना मिळतील याची शक्यता नाही, केवळ कंपनीच्या एकतर्फी हिताची पर्जन्यछायेखालील अवर्षणग्रस्त कमी योजना असल्याचे यातून स्पष्ट आहे.
...............
जुनी पीक विमा योजना...
टप्पा १- कमी पाऊस. फळधारणा कालावधी १५ जुलै ते १५ ऑगस्ट.
टप्पा २ कमी पाऊस फळवाढ कालावधी १७ ऑगस्ट ते १५ ऑक्टोबर.
टप्पा ३- जास्त पाऊस फळ पक्व ते फळ काढणी १६ ऑक्टोबर ते ३० डिसेंबर. वरील योजनेत कमी पावसाच्या भागातील शेतकऱ्यांना टप्पा एक दोनमध्ये परतावे मिळत होते.
............
यावर्षी परत येणार जुनी पीक विमा योजना...
२०२०-२०२१ मध्ये शासनाने फळबागांच्या विमा परताव्याचे ट्रिगर बदलविले होते,हे ट्रिगर क्लिष्ट असल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान होऊनही विमा परतावे मिळाले नाही. मात्र चालू वर्षापासून शासनाने २०१९-२०२० पूर्वीचेच ट्रिगर लागू करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती राज्य सरकारच्या कृषी विभागातील एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले आहे.त्यामुळे पुढील वर्षापासून पीक विमा मिळण्याच्या शक्यता तयार झाली आहे.