पित्याचा मुलीवर अत्याचार

By Admin | Updated: March 17, 2016 23:39 IST2016-03-17T23:29:31+5:302016-03-17T23:39:55+5:30

पारनेर : स्वत:ची एकोणीस वर्षीय मुलगी रात्री घरात झोपलेली असताना तिच्यावर नराधम बापानेच अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार देवीभोयरे (ता. पारनेर) येथील बेलोटेवस्तीवर मंगळवारी रात्री उघडकीस आला.

Oppression of father's daughter | पित्याचा मुलीवर अत्याचार

पित्याचा मुलीवर अत्याचार

पारनेर : स्वत:ची एकोणीस वर्षीय मुलगी रात्री घरात झोपलेली असताना तिच्यावर नराधम बापानेच अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार देवीभोयरे (ता. पारनेर) येथील बेलोटेवस्तीवर मंगळवारी रात्री उघडकीस आला. या नराधम बापाला पारनेर पोलिसांनी अटक केली आहे.
देवीभोयरे येथील बेलोटेवस्तीवर राहणाऱ्या एका कुटुंबात एकोणीस वर्षीय मुलगी रात्री भावासह घरात झोपली होती. रात्री नराधम बापाने तिच्यावरच अत्याचार केला. हा प्रकार उघड झाल्यानंतर पीडित मुलीने बुधवारी रात्री पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर त्या बापाला पारनेर पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक दिलीप पारेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करीत आहेत.या प्रकाराने तालुक्यात संताप व्यक्त होत आहे. एकच दिवसापूर्वी शेजारील वडझिरे गावात दोन जणांनी तेरा वर्षीय शाळकरी मुलीवर अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच हा संतापजनक प्रकार घडल्याने तालुक्यात संताप व्यक्त होत आहे.
(तालुका प्रतिनिधी)

Web Title: Oppression of father's daughter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.