मोबाइल टॉवरला विरोध, नागरिकांचा चौकात रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:26 IST2021-09-06T04:26:02+5:302021-09-06T04:26:02+5:30
यावेळी वाहतूक कोंडी झाल्याने आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या आंदोलनात ॲड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, वीरबहादूर प्रजापती, डॉ. अजित ...

मोबाइल टॉवरला विरोध, नागरिकांचा चौकात रास्ता रोको
यावेळी वाहतूक कोंडी झाल्याने आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या आंदोलनात ॲड. कारभारी गवळी, अशोक सब्बन, वीरबहादूर प्रजापती, डॉ. अजित बोरा, यशवंत शिंदे, विठ्ठल सुरम, गंगाधर नजन, संध्या पवार, शिल्पा कुलथे, ललिता गवळी, रिंकू दांगट, वसुधा शिंदे, माधवी दांगट, लता बोरा आदींसह धर्माधिकारी मळा परिसरातील नागरिक सहभागी झाले होते.
धर्माधिकारी मळा परिसरात मोबाइल टॉवर उभारण्याचे काम सुरू करण्यात आले होते. आरोग्यावर दुष्परिणाम होण्याच्या भीतीने स्थानिक नागरिकांनी या मोबाइल टॉवरला विरोध दर्शविला होता. महापालिका प्रशासनाने सदर काम तात्पुरत्या स्वरूपात बंद पाडले. मात्र, काही दिवसांनंतर हे काम पुन्हा सुरू झाले. सदर टॉवरचे काम अंतिम टप्प्यात आहे. फाइव्ह-जी मोबाइल टॉवरच्या विद्युत चुंबकीय लहरीमुळे पाचशे मीटर अंतरावरील नागरिकांच्या आरोग्यास धोका असल्याने स्थानिक नागरिकांचा या टॉवरला विरोध आहे.
...................
फोटो ०५ आंदोलन
धर्माधिकारी मळा येथे उभारण्यात येत असलेल्या फाइव्ह-जी मोबाइल टॉवरचे काम त्वरित बंद करण्यासाठी नागरिकांनी प्रेमदान चौकात रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.